शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात लक्झरी बस कलंडली; १८ जखमी

By admin | Updated: February 23, 2016 00:34 IST

एकाची प्रकृती गंभीर : तीव्र उतार वळणावरून वाहने कलंडण्याचे प्रकार सुरूच!

 खेड/मंडणगड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात तीव्र उतार वळणावरून वाहने कलंडण्याचे प्रकार अद्याप सुरूच असून, रविवारी दुपारी लक्झरी बस कलंडल्याने झालेल्या अपघातामध्ये बसमधील १८ प्रवासी जखमी झाले. या जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्या नाकातून होणारा रक्तस्त्राव बंद झाल्यानंतरच प्रकृती स्थिर होईल, असे ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रविवारी ठाणे येथून २८ प्रवासी घेऊन खेड येथे निघालेली प्रताप ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (एमएच ४३ एच ७०७०) ही कशेडी घाटात चोळई येथे आली असता घाटरस्त्याच्या प्रारंभीच कलंडली. यावेळी ड्रायव्हर शिवाजी महादेव कराळे (साईनाथनगर, ठाणे) याच्याऐवजी बदली चालक रमेश वसंत घाणेकर हा लक्झरी बस चालवित होता. त्याला घाटाच्या तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने लक्झरीवरील ताबा सुटून लक्झरी बस कलंडली. यावेळी लक्झरबसमधील एकूण २८ प्रवाशांपैकी सुनंदा घाणेकर, सीताराम घाणेकर, रोहन घाणेकर, रघुनाथ शिंंदे, लक्ष्मी निर्मले, मधुकर निर्मले, बदली चालक रमेश घाणेकर, प्रतीक्षा घाणेकर, प्रवीण घाणेकर, सुनिता घाणेकर, दिनेश घाणेकर, सुरेखा बर्जे असे एकूण १८ प्रवासी जखमी झाले. यावेळी बदली चालकाने वाहन चालविण्याचा प्रयत्न केला नसता तर अपघात टळला असता, असे काही जखमी प्रवाशांचे म्हणणे होते. या अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक बी. टी. महाजन व अनिल अंधेरे यांनी अपघातस्थळी हजर होत जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना केले आणि रस्त्यावरून कलंडलेली लक्झरी बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याठिकाणी समोरासमोर टक्कर होण्याचे प्रकारही घडतात. यामागे तीव्र वळण कारणीभूत ठरत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)