आवाशी : खेड तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतीतर्फे ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत गावातील सर्व कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्यांनीही या मोहिमेत योगदान दिले.
सर्वेक्षणासाठी ग्रामपंचायतीने एकूण तीन पथके तयार केली हाेती. त्यामध्ये अंगणवाडी सेविका, आरोग्य सहाय्यक, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका आदींचा समावेश होता. यावेळी गावातील सर्व कुटुंबातील व्यक्तींचे तापमान, ऑक्सिजन पातळी, ताप, सर्दी खोकला अथवा इतर आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनाबाबत काळजी घेऊन शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानात सरपंच चंद्रकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच नितीन कडू, सदस्य संकेत चाळके, जान्हवी शिंदे, श्वेता काते, सचिन काते, शीतल ठसाळे, सुदैवी ठसाळे, नीलिमा चाळके, ओंकार चाळके, ग्रामसेवक जी. डी. केदार, आशासेविका रेश्मा हळदे, नयन चाळके, मनोज जाधव आदींनी सहभाग घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून कंपन्यांच्या सहकार्याने मास्कचे वाटप, गावात औषध फवारणी केली जाणार आहे.