शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

लोटेत गोवा बनावटीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप टेम्पो पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ...

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप टेम्पो पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. बोलेरो टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करून टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी कुंभार्ली घाटात मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या दारूसह सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभाग अजून अधिकच दक्ष झाला आहे. या विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, रत्नागिरी जिल्हा प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली खेड व चिपळूण विभागातील निरीक्षक व कर्मचारी यांनी लोटे येथे गोव्याकडून येणाऱ्या वाहनांची २५ रोजी तपासणी मोहीम राबविली. यावेळी या परिसरात गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग खेडचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव यांना एक गोपनीय माहिती मिळाली. यानुसार लोटे एक्सेल फाटा येथे संशयित वाहनांची तपासणी करीत असताना बोलेरो पिकअप टेम्पो तपासणीसाठी थांबविला. त्या टेम्पोच्या मागील भागात गोवा बनावटीच्या दारूचे ९२ बॉक्स आढळले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने टेम्पोचालक पांडुरंग दयानंद कदम (रा. वालोपे बेंडकरवाडी, चिपळूण) याच्याकडून गोवा बनावटीची दारू, बोलेरो पिकअप गाडी, मोबाईल असा ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक जाधव, तसेच दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, सहायक दुय्यम निरीक्षक आर. बी. भालेकर, जवान ए. के बर्वे, तसेच चिपळूण विभागाचे प्रभारी निरीक्षक एस. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक एन. डी. पाटील, जवान आणि वाहन चालक अतुल वसावे, तसेच जवान एस. एन. वड व शेख यांनी केली आहे.