शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोटे, गुहागरात मोठे उद्योग प्रस्तावित

By admin | Updated: May 4, 2016 00:45 IST

रवींद्र वायकर : कोकण विकासाला गती देण्याला सर्वाेच्च प्राधान्य; खेड्यांना पक्के रस्ते

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातून कोकणच्या विकासाला गती देणं यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ राज्यात राबविण्यात येत आहे. यामुळे कोकणातील खेड्यांना चांगले पक्के रस्ते उपलब्ध होणार आहेत, असे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले. ‘मेक इन महाराष्ट्र’ धोरणातून जिल्ह्यात लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रात, तसेच गुहागर परिसरात मोठे उद्योग प्रस्तावित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंंदे, परिविक्षाधीन अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.वायकर म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यातील ४७ गावांमध्ये जलसमृध्दीची कामे सुरु आहेत. आता यामध्ये नव्याने सन २०१६-१७ साठी २७ गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी - कर्मचारी हे आपले एक दिवसाचे वेतन देणार आहेत. या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.रत्नागिरी पर्यटन महोत्सवातून चिपळूण परिसरातील बॅकवॉटर पर्यटनाची ओळख होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे सहाय्यक जिल्हाधिकारी विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, महसूल विभागाच्या तहसीलदार प्रियंका आयरे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच चिपळूण तालुक्यातील टेरवचे तलाठी व्ही. डी. मोहिते यांना आदर्श तलाठी पुरस्कार, पोलीस महासंचालक पदकप्राप्त राजेंद्र सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखेचा चमूचा, पोलिसांना मदत करणाऱ्या सचिन जंगम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचा उत्कृष्ट लघु उद्योजक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मे. सावरकर फुडस्, म्हाबळे (ता. संगमेश्वर) यांना तर द्वितीय पुरस्कार सतीश पांडुरंग पेडणेकर, भागीदार मे. विजय इंजिनिअरींग कंपनी, रत्नागिरी यांना देण्यात आला. (प्रतिनिधी)रत्नागिरीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सौभाग्यवतींनी एकत्रित येऊन बचतगट सुरू केला आहे. या बचत गटातील महिलांचा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी सत्कार करण्यात आला.कॅमेऱ्यांचे नियोजन : गावांचा विकाससमुद्रकिनाऱ्यावरील संवेदनशील ठिकाणे आणि शहरातील अंतर्गत भागात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोलीस दलाने महिला सुरक्षेसाठी विकसित केलेले ‘प्रतिसाद’ हे मोबाईल अ‍ॅप राज्यात एक आदर्श प्रयोग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. अंतर्गत सुरक्षेबरोबरच भारतमातेच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील शहीदांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असून, या अंतर्गत शहीदांच्या गावांचा नाविन्यपूर्ण योजनेतून आदर्श गाव म्हणून विकास करण्यात येणार आहे.