शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

‘जलस्वराज्य’मधून मुबलक पाणी

By admin | Updated: July 25, 2016 00:32 IST

सत्यनारायण : जागतिक बँकेच्या मदतीने राज्य सरकारकडून टप्पा दोनचे काम

चिपळूण : जलस्वराज्य योजनेतून गावातील सर्व ग्रामस्थांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचे जागतिक बँकेचे ध्येय आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे मत जागतिक बँकेने जलस्वराज्यासाठी नियुक्त केलेले अभियांत्रिकी तांत्रिक सल्लागार सत्यनारायण यांनी व्यक्त केले. जागतिक बँकेच्या मदतीने राज्य सरकारकडून जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १८ गावांची निवड झाली असून, योजनेचा आराखडा बनवण्याबरोबरच संबंधित स्थापन केलेल्या समित्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. योजनेला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी निवड झालेल्या गावांपैकी चिपळूण तालुक्यातील खेर्डी आणि खेड तालुक्यातील मांडवे या गावांची जागतिक बँकेच्या समितीने पाहणी केली. यावेळी योजनेअंतर्गत जागेची पाहणी करण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास खेर्डी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात समितीने ग्रामस्थांशी संवाद साधला. सरपंच जयश्री खताते यांच्या हस्ते सत्यनारायण यांच्यासह समितीमधील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. सत्यनारायण म्हणाले की, जलस्वराज्य योजनेतून गावातील सर्व ग्रामस्थांना घरपट नळ कनेक्शन द्यायचे आहे. पाण्यावाचून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी योजनेत शुध्दीकरण प्रकल्पाचाही समावेश असेल. या योजनेसाठी होणारा सर्व खर्च जागतिक बँक करणार असून, त्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. जलस्वराज्यचे उपसंचालक शशांक देशपांडे यांनी योजनेचा उद्देश स्पष्ट केला. अद्ययावत असलेल्या या योजनेत ग्रामपंचायतीच्या सर्व मागण्यांचा समावेश आहे. २०३२पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करुन ही योजना बनवण्यात येईल. तसेच या योजनेचा सर्व खर्च जागतिक बँक उचलणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर प्रस्तावित योजनेच्या उद्भव विहिरीची पाहणी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व १८ योजनांची मंजुरी अंतिम टप्प्यात असून, आगामी तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही समितीने सांगितले. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ रितू जैन, रामानंद जाधव, सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापक लोखंडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. व्ही. सावंत, उपअभियंता जंगम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सरपंच जयश्री खताते, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, सदस्या विकल्पा मिरगल, प्रियांका भुरण, ग्रामविकास अधिकारी ए. के. शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी) १८ गावांची निवड : घरपट नळ कनेक्शन ४जलस्वराज्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८ गावांची निवड़ ४समित्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू. ४योजनेला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी निवड झालेल्या गावांची पाहणी. ४सर्व ग्रामस्थांना घरपट नळ कनेक्शन देणार.