शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाने आगार तोट्यात

By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST

आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी खासगी सेवेकडे

विनोद पवार - राजापूर -गेल्या काही महिन्यांपासून राजापूर एस. टी. आगारातील अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. कोणताही विचार न करता तालुक्यातील अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये अचानक बदल करण्यात येतो. त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. राजापूर एस. टी. आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी खासगी सेवेकडे वळता दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगारातील अधिकाऱ्यांनी अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केले. त्यामुळे प्रवासी एस. टी. बसने प्रवास करणे टाळत आहेत. राजापूर आगारातून सुटणारी राजापूर-हातदे गाडी अचानकपणे कोंड्येपर्यंत नेण्यात आल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोच, शिवाय वेळेचाही अपव्यय होत आहे.समाजात आपली पाठ थोपटली जावी, यासाठीच एखाद-दुसऱ्याने गाडीची मागणी केली तर येथील अधिकारी ती मागणी पूर्ण करतात, असा आरोप आता वाहक-चालकांमधूनच करण्यात येत आहे. मात्र, ती मागणी पूर्ण करताना कोणत्याही प्रकारे भारमानाचा विचार करण्यात येत नसल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे राजापूर आगारातील अनेक गाड्या फक्त डिझेल जाळण्याचेच काम करत आहेत. नव्याने उपलब्ध करून दिलेल्या मार्गावर किती भारमान आहे, याचा विचार केला जात नाही. वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे प्रवासीदेखील खासगी आणि स्वस्त सेवेचा वापर करत आहेत. त्याचाच सर्वाधिक परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. कोणत्याही प्रकारचा विचार न करता बहुतांश मार्गांवरील गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केल्यामुळेच आगाराचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे.काही अधिकारी वेगवेगळे प्रयोग करून आगाराचे उत्पन्न वाढवण्याऐवजी ते कमी करण्यासाठीच हा निर्णय घेत आहेत की काय, अशी शंका घेण्यास जागा आहे. त्यामुळे राजापूर आगाराची स्थिती ‘नाकापेक्षा मोती जड’ अशीच झाली आहे. त्यामुळे मनमानी करणाऱ्या अधिकारी व त्यांच्याभोवती फिरणाऱ्या कंपूवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.