शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : सूर्यकांत दळवींची डीएनए टेस्ट करा : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 16:30 IST

सूर्यकांत दळवी यांना जर नात्यांचा विसर पडला असेल व ते जर मधुकर दळवी यांना आपला भाऊ मानत नसतील तर त्यांनी आता आपापली ह्यडिएनएह्ण टेस्ट करून घ्यावी, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी मारला आहे. सोवेली येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देदळवींची डीएनए टेस्ट करा : रामदास कदमते राजकारण वेगवेगळे : रोहिणी दळवी

दापोली  : सूर्यकांत दळवी यांना जर नात्यांचा विसर पडला असेल व ते जर मधुकर दळवी यांना आपला भाऊ मानत नसतील तर त्यांनी आता आपापली ह्यडिएनएह्ण टेस्ट करून घ्यावी, असा उपरोधिक टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी मारला आहे. सोवेली येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, सूर्यकांत दळवी यांनी गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपाचा प््राचार केला. यानंतर त्यांनी तटकरे यांना त्यांच्या घराचे दरवाजे खुले केले. अनेक जाहिर कार्यक्रमात त्यांना ज्यांनी पाडले, त्या आमदार संजय कदम यांच्या सोबत असतात.

यामुळे आता सूर्यकांत दळवी हा विषय आमच्यासाठी संपला आहे. त्यांना आम्ही यापुढे अधिक किंमत देणार नाही. आता कुंकू कुणाचे लावायचे, मंगळसूत्र कुणाचे घालायचे व साडी कुणाची नेसायची हे त्यांनी ठरवावे, अशी खरमरीत टीका देखील त्यांनी यावेळी केली.मधुकर दळवी म्हणाले की, दुसऱ्या पक्षात गेलेल्या व पुन्हा शिवसेनेत आलेल्या मुंग्यांची आता वारूळे झाली आहेत. या मुंग्या आता एखादा गांडूळ वारूळाकडे कधी येतोय व आपण त्याला कधी फस्त करतोय, याची वाट पहात आहेत. मधुकर दळवी हे आपले सख्खे नातेवाईक नाहीत.

शिवाय पक्षात वेळवीतील एक मुंगी जरी आली, तरी रामदास कदम तिचे स्वागतच करतील, अशी प्रतिक्रिया मधुकर दळवी यांच्या शिवसेना पक्षपुनर्प्रवेशावर माजी आमदार व मधुकर दळवी यांचे भाऊ सूर्यकांत दळवी यांनी दिली होती, यावर ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, राजकारणात माणूस अधोगतीकडे निघाला की त्याला नात्यांचा विसर पडतो. मी तर पुन्हा स्वगृही परत आलेलो आहे. यामुळे पक्षातील अनेक जेष्ठांना आनंद झाला आहे. सूर्यकांत दळवी यांना मात्र मी पक्षात आल्यावर नात्यांचा देखील विसर पडला आहे.ते राजकारण वेगवेगळे : रोहिणी दळवीमधुकर दळवी यांच्यामुळे मी राजकारणात आले, तो विषय फार वेगळा होता. माझ्या सासऱ्यांंनी माझ्या विजयाचा विषय प्रतिष्ठेचा बनवला व त्यामुळे मी निवडून आले. आता सूर्यकांत दळवी यांना मी त्यांची वहिनी नसल्याचा साक्षात्कार झाला आहे. ते आमचे यापुर्वी कुटुंबप्रमुख होते, आज देखील आहेत व उद्या सुध्दा रहातील. राजकारण हे काही वर्षांचे असते. नाती मात्र अनंत काळाची असतात. यामुळे ते जरी नाते विसरले असले तरी आम्ही मात्र आमची नाती विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहिणी दळवी यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गRamdas Kadamरामदास कदम