कुवे : थंडीचा हंगाम सुरु होताच लांजातील ग्रामीण भागातील जंगलांमध्ये आता कातभट्ट्या धगधगू लागल्या आहेत. रंग, गुटखा, पानमसाल्यासाठी उपयोगी असणाऱ्या काताची मागणी वाढू लागली आहे. किलोमागे मिळणारे उत्पन्न वाढल्याने खैराची झाडे चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.कातासाठी लागणाऱ्या खैराच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. या काताचा उपयोग विविध प्रकारच्या रंगांसाठी आदीसह पानमसाल्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे काताला खूप मागणी आहे. मात्र, या कातासाठी लागणाऱ्या खैराच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने आता ही खैराची झाडे दुर्मीळ होऊ लागली आहेत. कात उत्पादकांवरतीही संक्रांत आली आहे. काताला किलोमागे ४०० ते ५०० रुपये दर मिळतो. या कातापासून मोठा फायदा असल्याने अनेक उत्पादक काताचे उत्पादन घेतात. उत्पन्न चांगले आणि रोख मिळत असल्याने खैरांची झाडे रात्रीच्या वेळेस तोडून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.पूर्वीच्या काळी या कातभट्ट्या जंगल परिसरात डोंगर कपारीत असायच्या. आता काताच्या भट्ट्या गावागावात दिसू लागल्या आहेत. या कातासाठी शेतकरी खैराची तोड मुळापासून करत असल्याने त्या ठिकाणी पुन्हा झाड उगवत नाही. त्यामुळे ही झाडे आता दुर्मीळ झाली आहेत. त्याचबरोेबर या वृक्षाची तोड झाल्यानंतर नव्याने लागवड करण्यात येत नाही. त्यामुळे कातभट्ट्या आता खैराच्या मुळावर उठल्या आहेत. (वार्ताहर)खैराच्या वृक्षांची तोडतालुक्यात सर्वत्र कातभट्ट्या.कातासाठी मोठ्या प्रमाणात खैराची तोड.खैरतोडीमुळे काताचे उत्पादन घटले.कातभट्टीमुळे खैर वृक्षांची संख्याही घटली.शेतकऱ्याला नफा मिळवून देणारा कात नामशेष होण्याच्या मार्गावर.रंग, गुटखा, पान मसाल्यासाठी काताचा होतो मोठ्या प्रमाणावर वापर.
कातभट्ट्यांची धगधग पुन्हा सुरु
By admin | Updated: November 5, 2014 23:45 IST