शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवन अमृत’ पाझरलेच नाही

By admin | Updated: May 4, 2016 23:54 IST

अल्प प्रतिसाद : रक्ताच्या तत्पर पुरवठ्याचे तीनतेरा

रत्नागिरी : रुग्णांना रक्ताचा तत्पर पुरवठा व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जीवन अमृत’ योजनेला रत्नागिरीतील नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.‘जीवन अमृत’ योजना ही सर्वप्रथम सातारा, सिंधुदुर्ग व पुणे या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यांनतर ७ जानेवारी २०१४ रोजी संपूर्ण महारष्ट्रात ही योजना सुरू करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. सुरूवातीच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रबरोबरच रत्नागिरीतूनही या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला.रुग्णांना तत्पर रक्तांचा पुरवठा व्हावा, म्हणून दोन वर्षापूर्वी ‘जीवन अमृत’ ही योजना सुरू करण्यात आली. ही सेवा महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय संस्था तयार करून ही संस्था रुग्णांपर्यंत पोहचून रक्तपुरवठा करण्याचे काम करते. ही शासकीय सेवा ४० किलोमीटरच्या आत किंवा एक तासांच्या अंतरावरील खासगी रुग्णालयांनाही पुरविण्यात येते. त्यासाठी खासगी रुग्णालयांनी रक्तपेढीची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर टोल फ्री क्रमांक १०४ वर फोन करून गरजेनुसार मागणी करावी लागते. त्यानंतर रक्ताची अद्ययावतरित्या तपासणी करून निव्वळ तासाभरात रुग्णांना रक्तपुरवठा केला जात आहे.या योजनेच्या सुरुवातीला नागरिकांकडूनही प्रतिसाद लाभला. सन २०१५ या कालावधीत सुमारे १९८ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. तर या चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलपर्यंत ५५ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांनी या सेवेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक हे शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतून रक्त न घेता खासगी रक्तपेढीतून रक्त घेतात. खासगी रक्तपेढीतून रक्त घेण्यासाठी खासगी रुग्णालये प्रवृत्त करतात. त्यामुळे सामान्यांच्या भल्यासाठी सुरू झालेल्या ‘जीवन अमृत’ सेवा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. (वार्ताहर)सन २०१५ रोजी १९८ रुग्णांनी घेतला लाभ.गुणवत्तापूर्वक रक्तपुरवठा तरीही नागरिकांची पाठ.१०४ टोल फ्री वर फोन केल्यास तासभरात रक्तपुरवठा.प्रथम सातारा, सिंधुदुर्ग व ठाणे या जिल्ह्यांतच सुरू होती जीवन अमृत योजना.काही खासगी रुग्णालयातून रुग्णांचे नातेवाईक ांना शासकीय रक्तपेढीतून रक्त न घेता खासगी रक्तपेढ्यांतून रक्त घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे या सेवेकडे ते पाठ फिरवत आहेत. रत्नागिरीच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये या सेवेची अवस्था अत्यंत बिकट असल्याची माहिती संबधित सूत्रांनी दिली.लांजा, पालीत सुविधारत्नागिरीमध्ये अमृत जीवन ही सेवा सुरू करण्यात आली असून, लांजा व पाली याठिकाणीही ही सेवा देण्यास प्रारंभ केला जाणार आहे.