शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालय कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण

By admin | Updated: September 5, 2014 23:30 IST

ऋण काढून सण साजरा : अनुदानाचा वार्षिक दुसरा हप्ता अद्याप मिळालाच नाही

सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक वाचनालयाच्या अनुदानाचा वार्षिक दुसरा हप्ता अद्याप न आल्याने कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. अबकड या दर्जाची जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालये आहेत. या वाचनालयाला शासनाचे अनुदान मिळते. वर्षातून दोन टप्प्यात मिळणाऱ्या अनुदानाचा दुसरा हप्ता आॅगस्टअखेर येतो. अद्याप हप्ता न आल्याने कर्मचाऱ्यांची परवड झाली आहे. अत्यल्प मानधनात कर्मचारी वाचनालयांची सेवा बजावित आहेत. वाचनालयातील नोकरीवरच त्यांचा चरितार्थ चालतो. सहा महिन्यांनी येणाऱ्या अनुदान हप्त्यातून संबंधित संस्था त्यांना मानधन देते. काही संस्थाचालक त्या मानधनातही काटछाट करून कर्मचाऱ्यांना जेरीस आणीत आहेत.त्याही परिस्थितीत कर्मचारी आपली सेवा बजावित आहे. आता तर आॅगस्टअखेर अनुदान न आल्याने गणेश चतुर्थी उत्सवाचा आनंद हरवलेला आहे. उसनवारी करून कर्मचारी हा सण साजरा करत आहेत. जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या माध्यमातून यापुढे जिल्ह्यातील सर्व वाचनालयांचे व्यवहार होणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारामुळे कोणता फरक पडतो. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १३१ सार्वजनिक वाचनालये आहेत. यापैकी कुडाळचे अद्ययावत एकमेव अ दर्जाचे रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय हे जिल्हा वाचनालय आहे. या वाचनालयाला वार्षिक ७ लाख २० हजार रुपये अनुदान मिळते, तर ५ तालुका अ वाचनालयांना ३ लाख ८४ हजार अनुदान, १० अ इतर ग्रंथालये २ लाख ८८ हजार अनुदान, २ ब तालुका ग्रंथालये २ लाख ८८ हजार अनुदान, ४४ ब इतर ग्रंथालये १ लाख ९२ हजार अनुदान, ४७ क इतर ग्रंथालये ९६ हजार अनुदान, २२ ड ग्रंथालये ३० हजार अनुदान अशी ग्रंथालये असून, सव्वातीनशे कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. काही कर्मचारी कुटुंबांचा चरितार्थ चालवण्यासाठी अन्य ठिकाणी रोजंदारीचेही काम करीत आहेत. अनुदान वेळेत मिळावे, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)