शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय भवन येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांसाठी वाचनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST

रत्नागिरी : विविध कोविड केअर सेंटरमध्ये जे पेशंट उपचारांसाठी दाखल होतात, त्यांना दाखल कालावधीत त्यांच्या मनात सकारात्मक विचार जर ...

रत्नागिरी : विविध कोविड केअर सेंटरमध्ये जे पेशंट उपचारांसाठी दाखल होतात, त्यांना दाखल कालावधीत त्यांच्या मनात सकारात्मक विचार जर आपण संक्रमित केले तर त्यांना बरे होण्यासाठी चांगला फायदा होईल, या विचारातून हेल्पिंग हँडस आणि कीर्तनसंध्या यांच्या पुढाकाराने आणि कै. कुसुमताई अभ्यंकर सार्वजनिक ग्रंथालयाच्या सहकार्याने कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनमधील कोरोना केअर सेंटरमध्ये वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

रत्नागिरीत सन २०१२ पासून कीर्तनसंध्या विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हेल्पिंग हँडच्या माध्यमातून कीर्तनसंध्या परिवार या रुग्णांना सामाजिक जाणिवेतून सर्वतोपरी मदत करत आहे. हे करत असताना सध्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये जे पेशंट उपचारांसाठी दाखल होतात, त्यांना दाखल कालावधीत त्यांच्या मनात सकारात्मक विचार संक्रमित केले तर त्यांना बरे होण्यासाठी चांगला फायदा होईल, असा विचार या स्वयंसेवकांच्या मनात उभा राहिला. सकारात्मक विचार संक्रमित करण्यासाठी पुस्तक हाच एकमेव पर्याय डोळ्यासमोर आला. मात्र, यासाठी कुणाचे सहकार्य घ्यायचे, हे ठरवत असतानाच कै. कुसुमताई अभ्यंकर सार्वजनिक ग्रंथालय यांचे नाव समोर आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष बापट, श्रीकृष्ण साबणे यांच्यासमोर हा विचार मांडला. त्यांनीही क्षणाचा विलंब न लावता कोविड केअर सेंटरमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी काही प्रेरणात्मक अशी १०० पुस्तके सर्व खबरदारी घेऊन वापरण्यास द्यायला संमती दिली. व मंगळवारपासून ही पुस्तके हेल्पिंग हँड आणि कीर्तनसंध्या यांच्यातर्फे देऊ केली.

आता तिथे छोटेखानी वाचनालयच तयार झाले आहे. तिथे असणाऱ्या रुग्णांनी पुस्तक नीट वाचून परत करण्याच्या अटीवर तेथील कार्यालयामधून पुस्तक घ्यावे आणि तिथे दाखल असेपर्यंत वाचून ते नीट सुस्थितीत परत करावे. जेणेकरून अन्य रुग्णांनाही चांगली पुस्तके वाचायला मिळतील व चांगले विचार संक्रमित होतील.

या उपक्रमाला हेल्पिंग हँड टीम, कीर्तनसंध्या परिवार, कोविड सेंटरमधील श्रध्दा मॅडम, कै. कुसुमताई अभ्यंकर सार्वजनिक ग्रंथालयाचे, श्रीकृष्ण साबणे, अध्यक्ष बापट, वाचनालयाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.