शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रमुखांना अभिप्रेत संघटना बांधणीचे काम करुया : योगेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

खेड : पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेले संघटना बांधणीचे काम करुन शिवसेना पक्ष संघटना अजून मजबूत करण्याचे ...

खेड : पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेले संघटना बांधणीचे काम करुन शिवसेना पक्ष संघटना अजून मजबूत करण्याचे आवाहन आमदार योगेश कदम यांनी केले. नवीन सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी संघटना मजबुतीकरणाचे काम सर्वांनी तन, मन, धन अर्पून करताना हे संपर्क अभियान यशस्वीपणे राबवून संघटना वाढवूया, असे आवाहन आमदार योगेश कदम यांनी खेड येथे शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख विजय जाधव, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला सभापती मानसी जगदाळे, माजी सभापती अण्णा कदम, विजय कदम, सुप्रिया पवार, अपर्णा नक्षे, रतन रांगडे, शहरप्रमुख निकेतन पाटणे, उपतालुकाप्रमुख विष्णू आंब्रे, अनंत काजारे, विभागप्रमुख श्रीकांत शिर्के, सुधीर कदम, विश्वास कदम, सचिव सचिन धाडवे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, सहसचिव संदीप कांबळे, सहसंघटक अंकुश काते, युवा सेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, युवा सेना सचिव राकेश सागवेकर, करण चव्हाण, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, नागेश तोडकरी, गटनेता बंटी तोडकरी, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना सचिव सचिन धाडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.