शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत लेप्टोचे आणखी सात रुग्ण

By admin | Updated: July 21, 2016 00:52 IST

उपचार सुरू असलेल्या लेप्टोच्या रुग्णांची संख्या १७ झाली

रत्नागिरी : जिल्ह्यात लेप्टोची लागण वाढतच चाललीआहे. बुधवारी आणखी सातजणांना लेप्टोची बाधा झाली असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या लेप्टोच्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे़ यंदा पावसाळा सुरू झाल्याापासून लेप्टोचे ९५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लेप्टोस्पॉयरोसिस बाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गायी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी माती, भाज्या याद्वारे माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास त्याची बाधा होते. आरोग्य विभागाकडून लेप्टोबाबत घ्यावयाची काळ जी यावर जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात लेप्टोचे आतापर्यंत एकूण ९५ संशयित रुग्ण आढळले होते. त्या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, रक्त तपासणीनंतर त्यातील १० जण लेप्टोबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्यामध्ये आणखी ७ रुग्णांची भर पडली आहे. रत्नागिरी तालुक्यातील अनंत पांडुरंग भाटकर (७८, भाट्ये), सुनील जयराम मोहिते (४३, मिरजोळे), सुहास दामू धनावडे (४४, गडनरळ), चिपळूण तालुक्यातील चिन्मय सुरेश प्रभू (१९, कापसाळ), संगमेश्वर तालुक्यातील सुनील रघुनाथ जाधव (४५, कोंडअसुर्डे), महादेव धोंडू बेंद्रे (४९, मोर्डेे) आणि लांजा तालुक्यातील मनोहर महादेव पांचाळ (६०, कोचरी) हे रुग्ण सापडले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत. शेतामध्ये काम करणारे लोक तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांनी त्यांना जखम झालेली असल्यास त्वरीत ड्रेसिंग करुन घ्यावे़ शक्यतो उघड्या पायाने पाण्यामध्ये जाणे टाळावे़ पायामध्ये गमबुट घालावेत़ उंदीर व घुशी यांचा नायनाट करण्यात यावा़ तसेच लेप्टोची लक्षणे रुग्णामध्ये आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन उपचार करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (शहर वार्ताहर)