शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बिबट्याच्या हल्ल्यातील मदत

By admin | Updated: August 24, 2014 22:38 IST

संगमेश्वर तालुका : २८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नुकसानभरपाई

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात गतवर्षी बिबट्याने धुमाकूळ घालून अनेक गावांमधील शेतकऱ्यांची पाळीव जनावरे ठार मारली होती. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाकडून नुकतीच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करुन नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती देवरुख वन विभाग कार्यालयाचे वनपाल तुकाराम यादव यांनी दिली.गतवर्षी तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामध्ये बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लक्ष्य करुन त्यांना ठार मारले होते. पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मारले गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यानंतर त्या - त्यावेळी वनपाल व वनरक्षकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीसुद्धा वन विभागाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपापले प्रस्ताव सादर केले होते.हे सर्व प्रस्ताव देवरुख वनविभाग कार्यालयाकडून चिपळूण येथील विभागीय वनअधिकारी कार्यालयात मंजूरीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी परिपूर्ण प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली. यामध्ये निवेखुर्दमधील विठ्ठल माईन यांची एक शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. त्यांना २ हजार ६२५ रुपये नुकसान भरपाई मिळाली तसेच कुटगिरीमधील लक्ष्मीबाई येडगे यांची गाय ३७५० रुपये, किरदाडी येथील सुरेश पेडणेकर यांचा बैल ३ हजार रुपये, किरदाडी येथील बाबासाहेब कदम यांचा बैल ५ हजार २५०, कुटगिरी बाबू येडगे यांचा बैल ९ हजार, कोसुंब सुरेश पांचाळ यांची पाडी २ हजार २५० रुपये, कुटगिरी धोंडिबा येडगे यांची गाय ५ हजार २५०, कुडवली नामदेव नवेले यांचा बैल ७ हजार ५०० रुपये, कुटगिरी बाबु येडगे यांची गाय मारल्याने ५ हजार २५० रुपये, मेघी मनीषा मोरे यांची पाडी ३ हजार ३७५ रुपये देण्यात आले.देवधामापूरमधील मंगेश बाईत यांचा बैल ३ हजार ३७५, कनकाडी गजानन धावडे यांची शेळी १ हजार ६८८ रुपये, मुर्शी बिऱ्या जांगळी यांची शेळी ३ हजार ७५०, कनकाडी महादेव मराठे यांची शेळी २ हजार २५०, बेलारी बुद्रुक महेश सुर्वे यांचा बैल ५ हजार २५०, मुर्शी गणपत जांगळी यांची शेळी ३ हजार, करंजारी गणेश मावळणकर यांचा पाडा २ हजार २५०, करंबेळेतर्फे देवळे दिलीप गोताड यांची शेळी ४ हजार ५०० रुपये, वांझोळे दिनेश कदम यांचा बोकड ४ हजार ५००, देवडे संतोष मोरे यांची गाय २ हजार २५० रुपये, पुर्येतर्फ देवळे तुकाराम कोलापटे यांचा बैल ६ हजार ७५० रुपये.फुणगूसमधील प्रभाकर दसोई यांची शेळी २ हजार २५०, करंबेळेतर्फे देवळे सखाराम धावडे यांची शेळी ४ हजार ५००, असुर्डे शर्मीला पानगले यांची गाय ३ हजार, लोवले नथुराम साळवी यांचा बैल ४ हजार १२५, कोसुंब शिवाजी जाधव यांचा बैल ६ हजार, आंबवली अनंत भेरे यांचा बैल ५ हजार ६२५ व पिरंदवणे येथील सुरेश घेवडे यांचा बैल बिबट्याने मारल्याने सहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. (वार्ताहर)