शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, नगराध्यक्षांच्या हाती ‘कल्पनेचा कुंचला’

By admin | Updated: May 4, 2016 01:07 IST

पर्यटन महोत्सव : जनजागृतीची मोहीम वेगात, भिंती रंगवण्याचा आवरला नाही मोह

चिपळूण : रत्नागिरी पर्यटन महोत्सवासाठी चिपळूण नगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी होर्डिंग्ज, स्टिकर व घरोघरी पत्रके वाटून जनजागृती केली जात आहे. अशातच शहरातील मुख्य रस्त्यावरील भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी करुन कोकणचे प्रतिबिंब उमटविण्यात आले आहे. ही चित्रे पाहताना पर्यटन महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनाही भिंतीवर चित्रे रंगविण्याचा मोह आवरला नाही. दि. ६ मेपासून पर्यटन महोत्सवाचे बिगूल वाजणार आहे. दमदार शोभायात्रेने या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. शोभायात्रेनंतर संगीत मैफल रंगणार असून, दि. ७ रोजी आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या महोत्सवासाठी शहरात रंगरंगोटी करण्यात आली असून, शोभायात्रेसाठी जीवंत देखावे तयार केले जात आहेत. शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी सावर्डे स्कूल आॅफ आर्टचे विद्यार्थी, ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांचे कलाशिक्षक, शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी शहरातील भिंतींवर कोकणची नजाकता दाखविणारी चित्रे रेखाटली आहेत. आमदार चव्हाण, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, सभापती स्नेहा मेस्त्री, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, आदी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या भिंतींची व चित्रांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी साकारलेली आकर्षक चित्रे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.ही चित्रे पाहून आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनीही चित्रे रंगविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही हातात ब्रश घेत भिंती रंगविल्या. या पर्यटन महोत्सवासाठी शहराची सफाई मोहीम वेगाने सुरु झाली आहे. आज मंगळवारी बहादूरशेख नाका ते पाग नाका दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेला कचरा साफ केला जात होता. शहरातील मुख्य रस्त्यांचीही साफसफाई वेगात सुरु आहे. हा गोळा केलेला कचरा जाळण्यात येत होता. त्यामुळे एकूणच शहरात या पर्यटन महोत्सवाची धामधूम व तयारी सुरु झाली आहे. चिपळूण शहरातून रिक्षा फिरवून या पर्यटन महोत्सवाबाबतच्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली जात आहे. (प्रतिनिधी)आमदार, नगराध्यक्षांनीही भिंतीवर रंगवली चित्रे.चिपळुणात ६ मेपासून पर्यटन महोत्सवाचे वाजणार बिगुल.शोभायात्रेनंतर संगीत मैफलीचे आयोजन.चिपळुणातील मुख्य रस्त्यांवरील भिंतींची रंगरंगोटी.महोत्सवासाठी चिपळूणची सफाई मोहीम वेगात सुरु.रिक्षाद्वारे उपनगरांमध्येही जनजागृती.चिपळुणात स्वच्छता मोहीमही वेगात.प्रशासन सज्ज.चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सवासाठी भिंतींची रंगरंगोटी सुरु आहे. भिंतींवरील आकर्षक चित्रे पाहून आमदार सदानंद चव्हाण व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनाही मोह न आवरल्याने त्यांनी हातात ब्रश धरला.