शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वंचित आघाडी, बसपाचा फटका कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:46 IST

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती, स्वाभिमान पक्ष व कॉँग्रेस आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत ...

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप युती, स्वाभिमान पक्ष व कॉँग्रेस आघाडीच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या राजकीय लढाईच्या रिंगणात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी व हिंदू महासभा यांनीही आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे या पक्षांच्या आव्हानाचा खरा फटका प्रमुख तीन उमेदवारांपैकी कोणाला अधिक बसणार याबाबतची उत्कंठा आता वाढली आहे.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत व गेल्या वेळी या मतदारसंघात कॉँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात असलेले व यावेळी स्वाभिमानतर्फे निवडणूक लढविणारे नीलेश राणे पुन्हा आमने- सामने आहेत.कॉँग्रेस आघाडीतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. निवडणुकीतील डावपेच म्हणून काही खेळी नेहमीच खेळल्या जातात. त्यानुसार काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उभे केले जातात. आपल्याला ज्यांचे सहकार्य मिळणार नाही, अशा मतदारांची मते प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळू न देता ती अपक्ष वा अन्य उमेदवारांकडे कशी वळवता येतील, असा या डावपेचांमागे उद्देश असतो.रत्नागिरी मतदारसंघात गेल्यावेळी युतीतर्फे लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विनायक राऊत यांना दीड लाखांचे मताधिक्य मिळाले होते, तर त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघात सेनेचे स्वत:चे मताधिक्य १ लाखावर आले. त्यामुळे या निवडणुकीत या १ लाख मताधिक्यात घट झाली तरीही विनायक राऊत यांना विजयापासून रोखता येणार नाही, असा सेनेचा दावा आहे. तर हे मताधिक्य पोखरण्यासाठी काही अपक्ष व अन्य आघाड्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची चर्चा आहे.रत्नागिरी - देवरुख येथील मारूती जोशी हे उमेदवार यावेळी वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. बहुजन समाजात त्यांना मानणारे लोकही आहेत. परंतु ते या मतदारसंघात विजयापर्यंत पोहोचू शकतील काय, हा राजकीय वर्तुळातील महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र, त्यांना मिळणारी मते ही मुख्य पक्षांच्या उमेदवारांची घटणारी मते असू शकतात.दुसरीकडे बहुुजन समाज पार्टीनेही वेंगुर्ल्याचे किशोर वरक यांना उमेदवारी दिली आहे. बसपाचीही या मतदारसंघात मते आहेत. हिंदू महासभेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.