शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काेंढे आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST

चिपळूण : तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या कोंढे उपकेंद्रात सोमवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. गावचे उपसरपंच हसन ...

चिपळूण : तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या कोंढे उपकेंद्रात सोमवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. गावचे उपसरपंच हसन खान यांनी पहिली लस घेऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. पहिल्या दिवशी गावातील ४५ वर्षांवरील ५० ग्रामस्थांनी पहिला डोस घेतला.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात व काही उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोंढेगाव खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून, येथील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे कोंढे उपकेंद्रात लसीकरणास परवानगी मिळाली यासाठी ग्रामपंचायत, ग्रामकृती दलाचे पदाधिकारी व सदस्य गेले काही दिवस पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, सोमवारपासून कोंढे उपकेंद्रात लसीकरण सुरू झाले आहे. यानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. मयेकर, आरोग्य सेविका पवार यांच्यासह सहकाऱ्यांचा सरपंच माधवी कुळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार ज्येष्ठ कार्यकर्ते भाई करंजकर यांनी केले.

-----------------------

चिपळूण तालुक्यातील कोंढे ग्रामपंचायतचे उपसरपंच हसन खान यांनी पहिला डोस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ केला. यावेळी डॉ. मयेकर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कुळे, आरोग्य सेविका पवार उपस्थित होते.