शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

लोटे पंचक्रोशी तहानलेलीच!

By admin | Updated: October 6, 2015 00:41 IST

घशाला कोरड : बारा गावांना पाणीच नाही

आवाशी : लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीसह एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असणारी बारा गावे अर्थात लोटे पंचक्रोशी गेल्या चार दिवसांपासून तहानलेली आहे. घशाला कोरड पडली तरीही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया वसाहतीतून उमटत आहे.महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवार, दि. १ रोजी दुपारनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला. विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी वीज कोसळणे, वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे अशा घटना घडल्या. चिपळूण शहरात तर काही घरातून पाणी शिरले. मात्र जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. असे असतानाच लोटे - परशुराम औद्योगिक वसाहत व परिसरातील गावातून शुक्रवारपासून पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही.येथील बारा गावांना एमआयडीसीकडूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. या गावातील नैसर्गिक स्रोत रासायनिक प्रदूषणामुळे निकामी व दूषित झाल्याने एमआयडीसीच्या पाण्याखेरीज कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. कदाचित किरकोळ तांत्रिक बिघाड वा वीजपुरवठ्याच्या अभावामुळे एक दिवस पाणी नसले तरी उद्या येईल, या आशेवर वसाहतीसह महिलावर्ग वाट पाहात राहिला. मात्र, रविवारपर्यंत पाणीच उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक, परप्रांतातून आलेले वाहनचालक, वाहक यांची फार कुचंबणा झाली. गावातील महिलांनी पावसाचे पाणी साठवून ते उकळून पिण्यासाठी वापरले तर काहींनी बोअरिंग वा टँकरचा आधार घेतला. याबाबत एमआयडीसीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयातील दूरध्वनीवर कुणीही उपलब्ध होऊ शकला नाही, तर भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, पीरलोटे येथील पाणी शुद्धीकरणावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता दुपारी पाणी सुरु केले असून, सायंकाळपर्यंत ते पूर्ववत होईल, असे सांगितले. मात्र, पाणीपुरवठा नेमका का पाणी खंडित केला, याचे उत्तर त्याने दिले नाही. (वार्ताहर)शुक्रवारपासून पिण्याचे पाणीच नसल्याने गैरसोय.पाणी सुरु करण्यात आल्याचे कर्मचाऱ्याचे म्हणणे.पाणीपुरवठा खंडित का झाला? याचे कारण गुलदस्त्यात.बोअरिंग, टँकरचा अनेकांनी घेतला आधार.