शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तिघा भामट्यांकडून वृद्धेचे दोन लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: January 29, 2017 23:22 IST

रत्नागिरीतील प्रकार; पोलिस असल्याची बतावणी

रत्नागिरी : फिरायला गेलेल्या वृद्धेला पोलिस असल्याची बतावणी करून सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर तीन अज्ञातांनी डल्ला मारला. स्मिता जनार्दन पावसकर (६९, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे या वृद्धेचे नाव असून, तिला लुबाडणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे, पावसकर या रविवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे फिरायला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे दीर परकार हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्यामुळे त्या त्यांना पाहण्यासाठी गेल्या. त्या वीस मिनिटांतच पुन्हा परकार हॉस्पिटलमधून आरोग्य मंदिर ते मजगाव रोडवरून घरी जाण्यास निघाल्या. त्या नार्वेकर बिल्डिंग येथे आल्या असता, दोघा अज्ञातांनी त्यांच्याशी आपण पोलिस असल्याची बतावणी केली. ‘पुढे खून झाला आहे. त्यामुळे तुम्ही अंगावर दागिने घालून फिरू नका, तुमचे दागिने आमच्याकडे काढून द्या’, असे त्यांनी पावसकर यांना सांगितले. त्या दोघांनी समोरून जाणाऱ्या एका व्यक्तीला बोलावले व त्यालाही असेच सांगून त्याच्याकडील दागिने मागून घेतले. त्याने ते दिल्यामुळे पावसकर यांचाही त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनीही आपल्याकडील पाटल्या, बांगड्या, चेन, माळ असा ८ तोळे २०० ग्रॅम वजनाचे सोने सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी त्या दोघांच्या हातात दिला. त्या दोघांनी ते कागदाच्या पुडीत बांधून पावसकर यांच्या पिशवीत टाकले. तोतया पोलिसांनी बोलावलेली व्यक्ती त्यांच्यातील असावी, असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, स्मिता यांनी घरी जाऊन ती पुडी उघडून पाहिली असता त्यामधील दागिने लंपास झाले होते. पुडीत बांगड्याच्या आकाराच्या इलेट्रीक वायरी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून त्या तोतया पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)