शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपव्दारे मीटर रिंडिंगमध्ये कोकण पिछाडीवर

By admin | Updated: September 6, 2016 23:43 IST

महावितरण कंपनी : पुणे विभाग आघाडीवर, राज्यात ६ लाख ५४ हजार २१५ मीटरचे रिडिंग

मेहरुन नाकाडे ---रत्नागिरी --घरबसल्या वीजबिल भरता यावे, त्याचबरोबर नवीन जोडणीच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ग्राहकांना जाण्याची गरज उरली नाही. शिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मीटरचे रिडिंग घेण्यासाठी ग्राहकांच्या दारात जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. महावितरणने तयार केलेल्या अ‍ॅपव्दारे दोन्ही गोष्टी शक्य झाल्या आहेत. महावितरणने तयार केलेल्या अ‍ॅपव्दारे राज्यात एकूण ६ लाख ५४ हजार २१५ मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. महावितरणच्या सर्व विभागांमध्ये मीटर रिडिंग घेण्यात पुणे विभाग अव्वल असला तरी कोकण मात्र पिछाडीवर आहे.महावितरण कंपनीने तयार केलेल्या मोबाईल अ‍ॅपमध्ये सरासरी वीजबिल टाळण्यासाठी मीटरचा फोटो व रिडिंग पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. नवीन वीज जोडणीसाठी अर्ज नोंदणी करता येते. वीजबिलाचा तपशील मोबाईल अ‍ॅपव्दारे घेता येतो. तसेच नेट बँकिंग, क्रेडिट - डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, कॅशकार्डव्दारे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विजेसंबंधी तक्रार नोंदणी ग्राहकास अ‍ॅपव्दारे करता येते, त्याचप्रमाणे तक्रारीचा पाठपुरावाही करता येतो. मागील देयकांचा तपशील व देयके भरणा केल्याच्या पावत्याही उपलब्ध होतात. याशिवाय महावितरणच्या इतरही सेवांबद्दल ग्राहकास आपला अभिप्राय नोंदवता येऊ शकतो. महावितरणच्या ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या संंकेतस्थळावर गुगल प्लेमधून अ‍ॅप डाऊनलोड करता येते. आयओएस अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर विविध सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यात २ कोटी ३१ लाख ५ हजार ९९५ ग्राहक आहेत. पैकी ४ लाख ३५ हजार १०८ ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप सेवेचा लाभ घेतला आहे. मोबाईल अ‍ॅपव्दारे ८ हजार ६३९ फीडरबाबत माहिती घेण्यात आली आहे. वीजपुरवठा स्थलांतर २ हजार ५२ ग्राहकांचे करण्यात आले असून, तांत्रिक सुविधा १ हजार ९२ ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. नवीन जोडण्या ६ हजार ४५७ तसेच विजेच्या १० जोडण्या अ‍ॅपव्दारे तोडण्यात आल्या आहेत.मोबाईल अ‍ॅप सेवेचा लाभ घेण्यात पुणे विभागाचा प्रथम क्रमांक लागतो. पुणे विभागात महावितरणचे एकूण २५ लाख ४ हजार २५९ ग्राहक असून, १ लाख ७९ हजार ८२५ ग्राहकाच्या मीटरचे रिडिंग मोबाईल अ‍ॅपव्दारे घेण्यात आले आहे. कल्याण झोनमध्ये २५ लाख ७३ हजार ४८७ ग्राहक असून, एक लाख ७९ हजार ३७३, नागपूर विभागात १० लाख १६ हजार ९७४ ग्राहक असून, १ लाख ९५०, अकोला विभागात ११ लाख ४३ हजार ८८५ ग्राहक असून, ३७ हजार ९६१ मीटरचे रिडिंग अ‍ॅपव्दारे घेण्यात आले आहे. बारामती विभागात २३ लाख २६ हजार ७२ ग्राहकांपैकी ३४ हजार ५१७, भांडूप विभागात एकूण १६ लाख ५५ हजार ३५ ग्राहक असून, ३२ हजार २८०, चंद्रपूरमध्ये ६ लाख ६४ हजार ९४६ ग्राहकांपैकी २५ हजार ५५७, कोल्हापूर विभागात १७ लाख ९८ हजार ९२१ ग्राहकांपैकी २० हजार ६१९ ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. नाशिक विभागात २२ लाख ९४ हजार ४३३ ग्राहकांपैकी १८ हजार १९६, अमरावती विभागात ११ लाख ४६ हजार ७२४ ग्राहक असून, १० हजार ७५४, नांदेड विभागातील ९ लाख ८९ हजार ३५१ ग्राहकांपैकी ४ हजार ५२६, जळगाव विभागात १३ लाख ९० हजार ८७ ग्राहकांपैकी ३ हजार ३८१, गोंदिया विभागात ५ लाख ४६ हजार ७२४ ग्राहकांपैकी २ हजार २९२, औरंगाबादमध्ये १० लाख ९० हजार ८२५ ग्राहक असून, २ हजार १८५, लातूर विभागात १२ लाख १६ हजार ७५ ग्राहक असून, १ हजार ३२४ ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. कोकण विभागात ७ लाख ९३ हजार १५ ग्राहक असून, केवळ ४७५ ग्राहकांचे मीटर रिडिंग अ‍ॅपव्दारे घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागांचा विचार करता कोकण विभाग मीटरच्या रिडिंगमध्ये पिछाडीवर आहे. भविष्यात मीटर रिडिंगमध्ये कोकण विभागाचा पहिल्या पाचमध्ये क्रमांक असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.मोबाईल अ‍ॅप ग्राहकांनी डाऊनलोड केल्यानंतर विजेसंबधी तक्रारी, नवीन जोडण्या, सरासरी वीजबिल टाळण्यासाठी मीटरचा फोटो व रिडिंग पाठविण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होते. शिवाय आॅनलाईन तक्रारी असल्यामुळे महावितरणलादेखील कोणतीही सबब सांगण्याची आवश्यकता नाही. महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल अ‍ॅपमुळे भविष्यात लाईनस्टाफला ग्राहकांच्या दारात जाऊन पैसे भरले का ? विचारण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या कोकण विभागाचा मोबाईल अ‍ॅप वापरात सातवा क्रमांक लागत असला तरी भविष्यात मोबाईल अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. कोकणवासीय ‘स्मार्ट सेवेचा’ वापर प्राधान्याने करीत असल्याने मोबाईल अ‍ॅप वापरात नक्कीच कोकण अग्रेसर असेल.- पी. एस. पाटील मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, प्रकाशगड-मुंबई.मोबाईल अ‍ॅपव्दारे प्रथम वीज जोडणी घेण्याचा मान गोंदिया विभागातील एका शिक्षिकेने घेतला आहे. मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तिने केलेल्या वीजजोडणी अर्जाची तत्काळ दखल घेत महावितरण कंपनीने एका दिवसात वीज जोडणी देऊ केली आहे. झटपट वीज जोडणी मिळविण्यासाठी ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.