टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोकण विभागीय मंडळाच्यावतीने कोकणातील मान्यताप्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व लिपिक यांचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्राचार्य, मुख्याध्यापक व लिपिक प्रवर्गातील जवळपास १३०० व्यक्तिंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून मंडळासंदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.कोकण विभागीय शिक्षण मंडळ लवकरच मुख्याध्यापक आणि लिपिक यांना प्रशिक्षण देणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम सोमवार, २५ आॅगस्टपासून सुरु होत आहे. चिपळूण, संगमेश्वर व गुहागर तालुक्यामधील प्राचार्य, मुख्याध्यापक व लिपिकांचे प्रशिक्षण दि. २५ रोजी युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे होणार आहे.या प्रशिक्षणात ३०० प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. दि. २६ रोजी खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांचे प्रशिक्षण ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे, बोरज (खेड) येथे आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी २५० प्राचार्य, मुख्याध्यापक व लिपिक उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.५, लांजा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवार, ९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कणकवली, वैभववाडी, देवगड व मालवण तालुक्यांचे प्रशिक्षण दि. ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. ९ सप्टेंबर रोजी कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात दि. १० सप्टेंबर रोजी सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यांचे प्रशिक्षण मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी येथे होणार आहे. सर्व प्रशिक्षण स्थळांवर सकाळी ११ वाजता प्रशिक्षण सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये सांकेतांक क्रमांक व मान्यता वर्धित, विषयमान्यता, आवेदनपत्र दाखल करणे, प्रलिस्ट, खासगी विद्यार्थ्यांबाबत तसेच खेळाडूंबाबतची कार्यवाही यासह जवळपास २१ विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
कोकण शिक्षण मंडळ देणार प्रशिक्षण
By admin | Updated: August 22, 2014 01:07 IST