शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
6
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
7
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
8
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
9
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
10
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
11
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
12
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
13
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
14
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
15
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
16
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
17
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
18
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
19
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
20
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

ठिकठिकाणी चोर सोडून संन्याशाला मार!

By admin | Updated: September 30, 2015 00:02 IST

लांजा तालुक्यातील प्रकाराचा अज्ञातांना फटका, अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना

लांजा : तालुक्यातील कुवे, लांजा बाजारपेठ आणि वैभव वसाहत या ठिकाणी अज्ञात व्यक्ती लोकांच्या दृष्टीपथात पडत आहेत. यामुळे तरूण मंडळी सर्वत्र जागता पहारा ठेवत आहेत. मात्र, या दहशतीची चोर सोडून संन्याशालाच जास्त झळ पोहोचत आहे. अनोळखी व्यक्ती दिसताच चोर समजून त्याला मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे.कुवे नवीन वसाहत, मराठवाडी, गुरववाडी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून अज्ञातांकडून विविध पक्ष्यांचे आवाज काढणे, महिलांच्या किंचाळण्याचा आवाज येणे, घराच्या कड्या वाजवणे, घरांवर दगड मारणे, असे नानाविध प्रकार घडत असल्याने येथील तरुणवर्ग रात्रभर जागता पहारा देत आहे. रविवारी रात्री वैभव वसाहतीत घराच्या मागील भागात महिलेला पाहताच एका अज्ञाताने उडी मारून पोबारा केला. त्यानंतर १०० तरुणांनी हातामध्ये लाठ्या, काठ्या घेऊन सर्वत्र शोध घेत परिसर पालथा घातला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. सोमवारी रात्री छोटूभाई देसाई हॉस्पिटलनजीकच्या तरुणांना रस्त्याच्या बाजूला मोरीचा आसरा घेतलेली एक व्यक्ती नजरेस पडली. त्यानंतरही सुमारे १५० तरुणांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन परिसर पालथा घालत असताना एका भाताच्या मळीमध्ये भात तुडविल्याचे तरुणांच्या लक्षात आले. या तरुणांबरोबर लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एच. आर. डंगारे हेसुध्दा आपल्या पथकासह अज्ञाताचा शोध घेत होते. मात्र, अज्ञात व्यक्ती पळ काढण्यात माहीर असल्याने माणसांचा कानोसा लागताच क्षणार्धात पळ काढतात. गेले दोन दिवस कुवे गावामध्ये होणारे प्रकार थांबले आहेत. मात्र, लांजामध्ये हे प्रकार वाढीस लागले आहेत.गेले पंधरा दिवस कुवे येथे घडत असलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यातील जनता अ‍ॅलर्ट झाली असून, गावामध्ये सायंकाळच्या वेळी अज्ञात व्यक्ती दिसताच त्याची विचारपूस केली जाते, चोर समजून त्याला प्रसादही दिला जातो. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास महाड येथील ६५ वर्षीय वृद्ध आपला रस्ता चुकले होते. ते वेरवली पिकअप शेडमध्ये थांबले होते. त्यांना येथील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. महाड येथील शांताराम सुखदेव उमासरे हे २७ सप्टेंबर रोजी मुंबईत जाण्याऐवजी चुकून सोमवारी दुपारी लांजा येथे आले. वेरवली मार्गावरुन जाणाऱ्या गाडीमध्ये बसले आणि वेरवली येथे उतरले. त्यांना काहीच समजत नसल्याने ते सायंकाळपर्यंत याच ठिकाणी थांबून राहिले. मात्र, अनोळखी असल्याने दुपारपासून सायंकाळपर्यंत एकाच ठिकाणी हे वृद्ध थांबल्याने ग्रामस्थांना शंका आली. येथील ग्रामस्थांनी त्यांची विचारपूस केली. मात्र, काहीच समजत नसल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांचे पुतणे तुकाराम काशिराम उमासरे यांनी लांजा येथे पोलीस स्थानकात येऊन आपले चुलते शांताराम उमासरे यांना ताब्यात घेतले आहे. रविवारी सायंकाळी कुवे येथे अज्ञात दिलीप पुनीराम चव्हाण (२३, रायपूर) याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच डी. पी. अब्दुल्ला (६०, केरळ) यांनाही लांजातील काही नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. तो कामाच्या शोधार्थ भटकत होता. (प्रतिनिधी)लांजा तालुक्यात पाहुणे जाताय? सांभाळून!सध्या लांजा तालुक्यात अज्ञातानी घातलेल्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्येक गावामध्ये जागता पहारा ठेवण्यात येत आहे. त्यामुळे गावात कोणी अनोळखी व्यक्ती दिसताच त्याला चोर समजून चोप दिला जातो. चोर सोडून संन्यासाला शिक्षा मिळत असल्याने पाहुणे जाताना दिवसाचेच जावे लागते.