शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मार्गताम्हाणे खुर्द-उमरोली पूल वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणात मार्गताम्हाणे खुर्द-उमरोलीला जोडणारा नदीवरील पूल सध्या चर्चेत आला आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणात मार्गताम्हाणे खुर्द-उमरोलीला जोडणारा नदीवरील पूल सध्या चर्चेत आला आहे. या पुलाचे बांधकाम नदीचा मूळ प्रवाह बदलून उभारण्यात आल्याने दोन्ही बाजूंच्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन येथील ग्रामस्थांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पुलाच्या दोनही बाजूने संरक्षक भिंती उभारण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

मार्गताम्हाणे खुर्द सुतारवाडीजवळ उमरोली गावाच्या हद्दीच्या नदीवरील या पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप दोन्ही बाजूकडील रस्ते झाले नसल्याने पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही. रस्ता रुंदीकरणात येथील जुना पूल तोडण्यात येऊन त्याच जागेवर नव्या पुलाची उभारणी न करता थोडा पुढे सरकवून नव्याने बांधण्यात आला. जुन्या पुलाला धरून नदीचा मूळ प्रवाह होता. तो आता नव्या पुलामुळे बदललेला दिसत आहे.

जुना पूल असताना नदीच्या दोन्ही बाजूने पक्क्या दगडाच्या भिंती होत्या. त्यामुळे नदीच्या दोनही बाजूने असणाऱ्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी घुसण्याचे प्रकार नव्हते. मात्र, आता नव्या पुलामुळे नदीचा प्रवाह एका बाजूला, तर पूल दुसऱ्या बाजूला असा उलटा प्रकार दिसत आहे. या पुलाला धरून नदीच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे किंवा भिंती न बांधल्यास पावसाळ्यात नदीला पूर येऊन त्याचे पाणी उमरोली हद्दीतील वस्त्यांमध्ये अधिक प्रमाणात घुसणार आहे. तसेच शेतीचेही मोठे नुकसान होणार आहे.

दरम्यान, या सर्व परिस्थितीची दोनही गावच्या ग्रामस्थांना जाणीव झाल्याने त्यांनी पुलाच्या ठिकाणी अधिकारी व ठेकेदाराला बोलावून येथील झालेल्या कामाचा जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंती घालून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपसरपंच गजानन कोतवडेकर, स्वप्निल मुंढेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------------------

गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणात मार्गताम्हाणे खुर्द-उमरोलीला जोडणारा नदीवरील पूल नव्याने उभारला जात आहे.