शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कशेडी घाट अजूनही ‘डेंजर झोन’मध्येच

By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST

छोट्या-मोठ्या दरडी कोसळत असल्याने हा मार्गच धोकादायक

खेड : महामार्गावरील कशेडी घाटात वारंवार कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता यामुळे कशेडी घाटाचा ‘डेंजर झोन’मध्ये सामावेश करण्यात आला आहे.गणेशोत्सव आणि शिमगा उत्सवात या मार्गावरील वाढणारी वाहतूक लक्षात घेता गतवर्षी या घाटात अजस्त्र दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विविध कारणांनी या मार्गावरील वाहतूक वारंवार खंडित होते. छोट्या-मोठ्या दरडी कोसळत असल्याने हा मार्गच धोकादायक बनला असून तो वारंवार बंद पडतो. कशेडी घाटासाठी महाड-शिरगाव येथून तुळशी खिंडमार्गे नातूनगर हा पर्यायी मार्ग आहे. काहीवेळा याच मार्गाचा वापर करावा लागतो. कशेडी घाट राज्यमार्ग असल्याने येथे वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाढणाऱ्या पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी सध्याच्या मार्गाच्या चौपदरीकरणासह तुळशी विन्हेरे मार्गाचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे़ प्रवाशांच्या दृष्टीने कशेडी मार्गावरील वाहतूक असुरक्षित आहे. यामुळे महामार्ग विभागाने आपली नजर या घाटरस्त्याच्या सुरक्षिततेवर ठेवली आहे. कशेडी ते खवटी हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातील धोकादायक घाट आहे. या घाटमाथ्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात़ मात्र, सतत वाढलेली वाहनांची संख्या, अवजड वाहतूक व निसर्गाचा कहर यामुळे हा घाट अतिधोकादायक बनला आहे़ रायगड जिल्ह्यातील भोगावच्या हद्दीत कित्येक वर्षांपासून कोसळणाऱ्या दरडींमुळे १५० मीटर अंतराचा रस्ताही खचला आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणात या रस्त्याचे काम होणार आहे. मात्र, दरडी कोसळण्याची भीती कायम राहणार आहे. जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीत धामणदेवी व भोगावच्या हद्दीत कोसळलेल्या दरडींमुळे हा मार्ग तब्बल बारा दिवस बंद होता. २०११मध्ये ऐन गणेशोत्सवात ३ आणि ४ आॅगस्टला खेड तालुक्यातील काळकाई मंदिरापासून जवळच तीन वेळा मोठ्या दरडी कोसळून हा मार्ग बंद झाला होता. महाड मार्ग बांधकाम विभागाकडून भोगाव गावच्या हद्दीत खचणारा रस्ता दरवर्षी दुरूस्त करण्यात येतो. परंतु हा रस्ता पुन्हा पुन्हा खचतो. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन आहे. मात्र तीन वर्षे ती बंद आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतकार्यात अडचणी निर्माण होतात. कशेडी घाटासाठी महाड-शिरगाव येथून तुळशी खिंडमार्गे नातूनगर हा पर्यायी मार्ग आहे़ हा राज्यमार्ग असल्याने कशेडी घाटातील वाहतूक ठप्प झाल्यानंतर पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)