पाचल : येथील श्री मनोहर हरी खापणे कला व वाणिज्य महाविद्यालयात मागासवर्गीय शिष्यवृत्ती, मैत्री संघ, बी. सी. बुक बँक विभागाच्यावतीने ऑनलाईन स्कॉलरशिप मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीच्या प्रारंभी प्रा. डॉ. बी. टी. दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथपाल मनोहर कोंडागुर्ले यांनी बी. सी. बुक बँक संबंधित योजनांची माहिती दिली. वाचन संस्कृतीस चालना मिळावी व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिकचे पुस्तक मिळावे यासाठी बी. सी. बुक बँक योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. एस. एस. धोंगडे यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनांसंबंधी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करून, आपले भविष्य उज्ज्वल करावे, असा संदेश प्राचार्य डॉ. प्रमोद मेश्राम यांनी दिला. राजेश चव्हाण यांनी आभार मानले. या बैठकीस सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.