शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

केतकीत एस. आर. तंत्रज्ञान मार्गदर्शन

By admin | Updated: June 17, 2015 00:37 IST

दादा गरंडे : कोकणातील शेतकऱ्यांना भात लागवडीतील तंत्राच्या टीप्स दिल्यास फायदा

चिपळूण : कोकणामध्ये खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या भातपीक पद्धतीत बदल सुचवण्यात आहेत. जमिनीची उकल, बेर आणि चिखलणी करून लावणी न लावता गादी वाफ्यावर भात बियाण्याची टोकणी केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचे सगुण भात लागवड तंत्र कोकणातील शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याचे मत कालुस्ते विभागाचे कृषी सहाय्यक दादा गरंडे यांनी व्यक्त केले. एस. आर. तंत्रज्ञानाबाबत कृषी सहाय्यक दादा गरंडे हे केतकी येथे माहिती देत होते. भातलागवड जून महिन्यात पूर्ण करण्याची असून, पीक वाढीच्या कालावधीत पावसाचे प्रमाण कमीजास्त झाले तरी उत्पन्न पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त मिळते. चिखलणी व लावणी करावी लागत नसल्यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ३५ टक्के बचत होते. तसेच बियाणे पेरणीनंतर निवडक तणनाशक गोल किंवा अ‍ॅक्झट्रिजीन वापर केल्यास तणाचा प्रादुर्भाव अत्यल्प राहतो. तसेच भात कापणीनंतर त्याची मुळे जमिनीत राहून कुजल्याने सेंद्रीय घटकाचे प्रमाण वाढते व जमिनीचा पोत व प्रत वाढते. ज्या ठिकाणी पाण्याची रब्बी व उन्हाळी हंगामात सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी कडधान्यवर्गीय भाजीपाला पिके घेऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रथम पाच ते दहा गुंठे प्रक्षेत्रावर प्रयोग केल्यास आत्मविश्वास वाढून पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर एस. आर. तंत्रज्ञानाने लागवड होईल, असा विश्वास गरंडे यांनी व्यक्त केला. यावेळी कृषी पर्यवेक्षक एस. एस. मिरगावकर, सचिन भागणे, अनंत भागणे, सूर्यकांत गोलमडे, विरेंद्र कांबळे, विठ्ठल भागणे, सुरेश गोलमडे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)खरिपाच्या भातपीक पध्दतीत बदल सुचविण्यावर भर. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी सगुण भात लागवड फायदेशीर. चिखलणी, लावणी करावी लागत नसल्याने उत्पादन खर्चात बचत. भातलागवड जूनमध्ये पूर्ण करावी.