शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कर्दे समुद्रात गाडीला जलसमाधी

By admin | Updated: September 13, 2014 23:32 IST

सुदैवाने सहा पर्यटक बचावले

दापोली : कोकणातील पावसाने विश्रांती देताच निसर्गसौंदर्य व समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात येऊ लागल्याने समुद्रकिनारे गजबजू लागले आहेत. पुणे येथील काही पर्यटक किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी कर्दे येथे एका रिसॉर्टमध्ये उतरले. शनिवारी सकाळी सफारी गाडीतून समुद्र किनाऱ्याची सफर करताना गाडी पुळणीत रुतली. अचानक समुद्राला भरती सुरु झाल्याने गाडी सोडून पर्यटकांना बाहेर पडण्याचा सल्ला स्थानिकांना दिल्याने गाडीतील पर्यटक बचावले. मात्र गाडीला जलसमाधी मिळाली. गणेशोत्सवानंतर पाऊस कमी झाल्याने कोकणात पर्यटक येऊ लागले आहेत. पाऊस कमी झाला असला तरी अजूनही समुद्र शांत झालेला नाही. परंतु काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या पाण्यात उतरु लागले आहेत. काहीजण आपल्या गाडीने समुद्राची सफर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र समुद्राची पुळण अजूनही भुसभुशीत असल्याने किनाऱ्यावर गाडी चालविणे धोक्याचे आहे. मात्र, ते पर्यटकांना सांगून पटत नाही. स्थानिकांनी पर्यटकांना गाडी किनाऱ्यावर चालवू नका, असे सांगितले होते तर अतिखोल पाण्यात उतरु नका, असाही सल्ला दिला होता. परंतु, स्थानिकांचा सल्ला न ऐकताच पर्यटकांनी गाडी कर्दे समुद्रकिनाऱ्यावर घातली. थोड्यावेळात गाडी वाळूत रुतली. गाडीला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही स्थानिकांनीसुद्धा गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली. परंतु समुद्राला भरती सुरु झाल्याने गाडी पाण्यात बुडू लागली. दुपारी १२ वाजेपर्यंत गाडी समुद्रात दिसत होती. परंतु दुपारी १२ नंतर गाडीला समुद्रात पूर्णपणे जलसमाधी मिळाली.अतिउत्साहाच्या भरात समुद्राच्या पाण्यात पर्यटक घुसू लागल्याने अनेक ठिकाणी जीवितहानी होत आहे तर काही ठिकाणी गाड्यासुद्धा समुद्रात बुडाल्याच्या घटना घडत आहेत. कर्दे समुद्रकिनाऱ्यावर गाडीला जलसमाधी मिळाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत गाडीचा अर्धा भाग दिसत होता. स्थानिक पातळीवर हालचाली केल्या असत्या तर गाडीला बाहरे काढता आले असते.सागरी सुरक्षा रक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र समुद्राच्या भरतीने गाडीला काढण्यात अपयश आले. या घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत हेही घटनास्थळी पोहोचले. (प्रतिनिधी)