शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोमसापचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार

By admin | Updated: February 25, 2015 00:14 IST

मुरबाड शाखेला मान : ५६ शाखांमधून केली समितीने निवड

खालगाव : कोकण मराठी साहित्य परिषदेतील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ५६ शाखांतील वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शाखेला सन्मानपूर्वक प्रमुख अतिथी संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.याच कार्यक्रमात कवी केशवसूत स्मारक, मालगुंड येथे वाङ्मयेतर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यामध्ये गुरुवर्य अ. आ. देसाई वाङ्मयीन कार्यकर्ता पुरस्कार कर्जत येथील अ‍ॅड. गोपाळ शेळके यांना, राजा राजवाडे वाङ्मयीन कार्यकर्ता पुरस्कार ठाणे येथील प्रा. दीपा ठाणेकर यांना, कोमसापच्या कार्यक्षेत्रात साहित्यविषयक योगदान देणाऱ्या व्यक्तीला, चंद्रकांत लक्ष्मण सावंत लक्षवेधी कोकण भूषण पुरस्कार ठाण्यातील साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांना, नमिता कीर कोमसाप ग्रामीण क्षेत्रातील स्त्री लेखिका निशा गुरव (लांजा) यांना, ठाणे जिल्हा क्षेत्रामार्फत पर्यावरण व साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार, बोरिवली येथील जोसेफ तुस्कानो यांना, साहित्य क्षेत्रातील शिक्षकांना दिला जाणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार अमेय देसाई यांना तसेच नगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी कै. सुलोचना मुरारी नार्वेकर, लक्षवेधी पुरस्कार गौरी सावंत यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण कला अकादमीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर होते. या पुरस्कार कार्यक्रमाला मधु मंगेश कर्णिक, डॉ. महेश केळुस्कर, प्रकाश साळवी, गजानन पाटील, सरपंच साधना साळवी, अरुण नेरूरकर, प्रभाकर नाईक साटम, अचला जोशी, रेखा नार्वेकर, उषा परब आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)