शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

काडवाळ आणि गरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

भात लावणीनंतरच्या फुरसतीच्या दिवसात आमच्या शेजारचा श्यामा, बुदी, बाबग्या, सुभल्या असे चार-पाचजण एरंडाच्या पानाच्या पुडीत काडू बांधून दररोज संध्याकाळी ...

भात लावणीनंतरच्या फुरसतीच्या दिवसात आमच्या शेजारचा श्यामा, बुदी, बाबग्या, सुभल्या असे चार-पाचजण एरंडाच्या पानाच्या पुडीत काडू बांधून दररोज संध्याकाळी नदीवर गरी (गळ) घेऊन जात. सावाच्या (नायलॉन)च्या दोऱ्याला दोन-तीन गऱ्या बांधून त्याची गरी बनवत. या गऱ्या व सावदोरा गावातल्याच भाई दुकानदाराकडे स्वस्तात विकत मिळे. चकचकीत व टोकदार गरीला काडू ओवून ती गरी विशिष्ट पद्धतीने गावकोंडीच्या नदीत टाकत. त्यांचे बघून मी व सुधीरही अशा गऱ्या घेऊन नदीवर जायचो. पण गरीला मासा लागेपर्यंत एका जागी शांत बसण्याची आमची तयारी नसायची. हे श्यामा वगैरे गरीचा साव बोटात पकडून कोंडीतले मासे गरी ओढीपर्यंत शांत बसून राहत. कोंडीतल्या माश्याने काडू खाण्यासाठी गरी गिळली की श्यामा चपळाईने हाचका देऊन गरी ओढायचा. गरी जबड्यात घुसलेला मासा गरीला अडकून तडफडत बाहेर यायचा. गरी बाहेर काढल्यावर गरीला अडकलेला मासा गरीपासून व्यवस्थित सोडवणे हेही कसबच होते. अश्याच गरीने श्यामा वगैरे काढय, वाळय, मराल, ठीगूर, मळये असे मासे पकडत. आमच्याही गरीला कधी-कधी एखादं दुसरा मासा लागायचा. असे मासे पकडण्यातही तेव्हा खूप मजा व गंमत वाटायची. असे मासे कधी पकडले तर आम्ही ते मासे विश्या भाटाला द्यायचो. कारण पूर्वीपासूनच आमच्या घरात गोड्या पाण्यातले ‘सावे’ मासे कोणी खात नाही. आई सांगते, या माशांना हिवस दर्प येतो त्यामुळे आपल्या घरात कोणी खात नाही. काढय, वाळय, ठीगूर हे गोड्या पाण्यातील मासे खूप चविष्ट असतात. पण त्यांचा काळा रंग, बुळबुळीतपणा व सापासारखा आकार यामुळे ते हातात पकडायलाही मला ‘इळईळीत’ वाटायचे. मात्र, आम्ही असे मासे खात नसलो तरी ते पकडण्याची व ते पकडण्यासाठी कितीही कष्ट करण्याची आमची तयारी असायची.

पूर्वी नदीतले मासे आवडीने खाणाऱ्या खवय्यांचा एक खास वर्गच होता. आजही असे मासे सर्वत्र आवडीने पकडले व खाल्ले जातात. परंतु, एकंदरीत पाहिले तर आता पूर्वीसारखी मजा राहिली नाही. काडवाळ, गरी यासोबतच चिवारीच्या भेतांच्या सळ्यांची ‘खून’ बनवून रात्रभर ती पाण्यात ठेवून पूर्वी मासे व कुर्ल्या पकडत असत. माझे आजोबा अशी छान खून बनवायचे. खुनीच्या तोंडात काडू, छोटे मासे वगैरे ठेवून ती व्हाळीत किंवा व्हाळात ढोपरभर पाण्यात बुडवून ठेवत. खून पाण्याबरोबर वाहून जाऊ नये म्हणून खुनीत एक जड दगड ठेवत व तिला दोरीने झाडाला बांधून ठेवत. रात्रभर अशा खुनीत मासे व कुर्ल्या शिरून अडकून राहायच्या. सकाळी ती खून उचलून घरी आणून तिच्यातील मासे, कुर्ल्या बाहेर काढायचो. पावसाळ्यातली ती पूर्वीची मजाच काही और होती.

- बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली.