शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

विहिरीत उडी मारुन चिमुकल्याला जीवदान

By admin | Updated: November 6, 2014 22:07 IST

ऐमान खानचे कौतुक : इशानसाठी लावली जिवाची बाजी

एजाज पटेल - फुणगूस -सुमारे १५ फूट खोलीच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पडलेल्या एका पाच वर्षीय मुलाला स्वत:च्या जिवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारुन वाचवण्याऱ्या ऐमान इजियास खान (फुणगूस, ता़ संगमेश्वर) याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे़  -फुणगूस खाडी भागातील कोंड्ये मुस्लिम मोहल्ला येथे ही घटना नुकतीच घडली़ इशान इम्रान बोदले खेळत असताना त्याचा अचानक पाय घसरुन तो थेट अर्धवट कठडा बांधलेल्या विहिरीत कोसळला़ ही विहीर पूर्णपणे पाण्याचे भरलेली आहे़  इशान विहिरीत कोसळल्याचे काही अंतरावर उभ्या असलेल्या आयशा नावाच्या चिमुरडीने पाहिले़ त्यानंतर तिने आरडा-ओरडा सुरु करताच आजूबाजूच्या महिलांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली़ त्यावेळी इशान गटांगळ्या खात असल्याचे पाहताच महिलांनीही धावा, वाचवा असा आक्रोश केला़ त्यावेळी जवळच्या घरामध्ये पुरुष मंडळी कोणीही नव्हती. त्यामुळे कोणालाच काही सुचेनासे झाले होते़ तरीही आरडाओरडा सुरुच होता़ त्यावेळी ऐमान खान व साकीब खान हे दोघेजण दुचाकीवरुन चालले होते़ महिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांनी आपली दुचाकी आवाजाच्या दिशेने वळवली़ त्यानंतर त्यांनी तत्काळ महिला आक्रोश करीत असल्याच्या ठिकाणी दुचाकी बाजूला लावून धाव घेतली़ समोरच इशांत हा विहिरीत गटांगळ्या खात असल्याचे पाहिले़ त्यावेळी ऐमान याने काहीही विचार न करता थेट विहिरीत झेप घेतली़ विहिरीच्या तळाशी जात असलेल्या इशानला त्याने चुटकीसरशी बाहेर काढले़ त्यानंतर आरडाओरड करीत असलेल्या महिलांनी सुटकेचा श्वास घेतला़ ऐमान व साकीब यांच्या धाडसामुळे इशानचा जीव वाचला़ त्यामुळे या दोघांचेही फुणगूस परिसरात कौतुक केले जात आहे. ऐमान व साकीब यानी दाखविलेल्या धाडसामुळेच इशानचे प्राण वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे.स्वत:च्या जिवाची पर्वा न करता दाखविले धाडस.कोंड्ये फुणगूस खाडी भागातील प्रकार. परिसरातील महिलांनी केली आरडाओरड.दुचाकीवरील ऐमानने प्रसंगावधान दाखवत प्राण वाचवले.सुरक्षेचा प्रश्न येणार ऐरणीवर.