शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जाधव-कदम गट निकमांसाठी एकत्र तरीही...

By admin | Updated: October 21, 2014 23:44 IST

कटुता अगर पक्षविरोधी काम केल्याची चर्चा नव्हती किंवा तसे आढळले नाही. तरीही निकम यांचा पराभव टळला नाही.

चिपळूण : कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांना निवडून आणायचेच असा चंग बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकमेकांचे पारंपरिक विरोधक आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांचे गट एकत्र काम करीत होते. तरीही पक्षाला अपयश आले. याचे शल्य अनेकांच्या उरी राहिले आहे.राजकारणाच्या पलिकडे समाजकारण जपणाऱ्या शेखर निकम यांच्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेसाठी संधी दिली. कोणत्याही परिस्थितीत निकम निवडून आले पाहिजेत, असे आदेश नेत्यांना देण्यात आले होते. २००९ च्या निवडणुकीतील १८ हजाराचे शिवसेना युतीचे मताधिक्य व लोकसभेचे मोदी लाटेतील ३१ हजाराचे मताधिक्य कमी करुन प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करायची होती. हे काम अवघड होते. पण अशक्य नव्हते. शिवसैनिकांमध्ये जी रग असते, जी इर्षा असते ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षनिष्ठेने काम करण्यापेक्षा उमेदवार कोण, आपल्याला कोणी बोलवले नाही, आपल्याला कोण विचारत नाही अशा अनेक नकार घंटा वाजवत असतात.या निवडणुकीत मात्र निकम यांच्यासाठी कदम व जाधव या दोन्ही गटाचे कार्यकर्ते कार्यरत होते. कोठेही कटुता अगर पक्षविरोधी काम केल्याची चर्चा नव्हती किंवा तसे आढळले नाही. तरीही निकम यांचा पराभव टळला नाही. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व गट-तट एकत्र होते. शिवाय सक्षम उमेदवार पक्षाने दिला होता. उमेदवार म्हणून जे जे काही करायचे ते निकम यांनी केले होते. कोणत्याही आघाडीवर निकम स्वत: कमी पडले नव्हते. प्रचारासाठीही त्यांनी स्वतंत्र यंत्रणा राबविली. परंतु, आम्ही असताना तुमची माणस कशाला असे सांगून काही पदाधिकाऱ्यांनी निकम यांना निश्चिंत केले. पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून निकम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अन्य भागाकडे वळविले. हा विश्वासच निकम यांना काही प्रमाणात त्रासदायक ठरला. अशी जबाबदारी घेणारे नेते व कार्यकर्ते काँग्रेसी स्टाईलने काम करीत राहिले. त्यांनी काम केले परंतु, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सक्षम उमेदवार व संपूर्ण यंत्रणा हातात असताना कार्यकर्त्यांनी चौफेर काम करायला हवे होते. तरच राष्ट्रवादीला पुन्हा विजय मिळविता आला असता. कारण प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण हेही तोडीसतोड व निष्कलंक चारित्र्याचे होते. त्यांच्यावर कोणताही आरोप किंवा डाग नव्हता याचे भान कार्यकर्त्यांनी राखणे गरजेचे होते. राष्ट्रवादीला चिपळूणमध्ये जे मताधिक्य मिळाले त्यात वैयक्तिक योगदान मोठे होते. या मतदारसंघात निवडणूक लढविताना पूर्वीचे मताधिक्य कमी करणे शक्य नाही. परंतु, निकम यांनी आपली कोरी पाटी व आतापर्यंतच्या कामाच्या पुण्याईवर चुरशीची लढत दिली. (प्रतिनिधी)