शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तिढा सुटला; बाजारपेठांचे भवितव्य टांगणीलाच...!

By admin | Updated: September 11, 2016 23:31 IST

मुंबई-गोवा महामार्ग : बाधित होणाऱ्या संबंधितांना दिलासा

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूसंपादनावरून काही शहरांमध्ये निर्माण झालेला तिढा उड्डाणपूल व ४५ मीटर रस्ता रुंदीच्या प्रस्तावामुळे सुटला आहे. खासदार विनायक राऊत यांनी तसे सांगितल्याने या प्रक्रियेत बाधित होणाऱ्या संबंधितांना दिलासा मिळाला आहे. परंतु उड्डाणपुलांमुळे महामार्गावरील वाहनांचा शहर बाजारपेठांशी असलेला संपर्क संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या बाजारपेठांचे भवितव्य टांगणीला लागल्याची चर्चा सुरू आहे. तब्बल दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉँक्रीटीकरणातून हे चौपदरीकरण होणार आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प होत आहे. सुमारे १२ हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या या चौपदरीकरण प्रकल्पाला रुंदीकरणासाठी अधिकची जागा लागणार आहे. त्याबाबतचे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर बाधित होणाऱ्यांच्या अनेक तक्रारी, आक्षेप पुढे आले. परिणामी चौपदरीकरण रखडणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. जमीनमालकांच्या तक्रारींपेक्षाही महामार्गावर असलेल्या शहरांतील मुख्य बाजारपेठा उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्त्यांची रुंदी वाढवण्यास विरोध सुरू झाला. मुख्यत्वे चिपळूण, पाली, लांजा व राजापूर येथे हा विरोध दिसून आला. चिपळूण, पाली व लांजा बाजारपेठ चौपदरीकरणात संपुष्टात येईल, अशी भूमिका व्यापारी व नागरिकांनी घेतली. त्यातून मार्ग काढण्यासाठी नंतर प्रयत्न सुरू झाले. चिपळूणचा विषय सर्वांत प्रतिष्ठेचा करण्यात आला होता. त्यामुळे हा मोठा अडथळा दूर करण्यासाठी तेथे उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सर्वेक्षणाअंती हाच उपाय सुचविण्यात आला. आता चिपळुणात उड्डाणपूल होणार हे निश्चित झाले आहे. पाली येथून दोन महामार्ग जाणार आहेत. मुंबई-गोवा तसेच रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्ग पालीतून जाणार असल्याने तेथील बाजारपेठेचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यासाठीही विरोध दर्शविण्यात आला. बायपास रोडचा प्रस्ताव पुढे आला. परंतु त्यामुळे बाजारपेठेचे अस्तित्त्वच संपून जाईल, असे चित्र निर्माण झाले. बाजारपेठेतूनच चौपदरीकरण करावे, परंतु कमी जागा वापरावी, असा मुद्दा पुढे आला. मात्र, आता पाली बाजारातून उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु वाहने उड्डाणपुलावरून जाणार असल्याने त्यामुळेही पाली बाजारपेठेचे महत्व कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लांजा बाजारपेठेतून मुंबई-गोवा महामार्ग जात असल्याने चौपदरीकरणात या बाजारपेठेचे मोठे नुकसान होणार होते. रुंदीकरणाच्या अटीनुसार चौपदरीकरण झाले, तर संपूर्ण बाजारपेठेवरच स्थलांतराचे संकट येणार होते. त्यामुळे लांजा बाजारपेठेतून चौपदरीकरण करताना रुंदीकरणासाठीच्या जागेची अट शिथिल करावी, अशी मागणी सुरुवातीला केली जात होती. मात्र, त्यामुळे तिढा सुटत नव्हता. अखेर लांजा बाजारपेठेतून उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजापूरचा विषय मात्र प्रलंबित आहे. सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेतूनही उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला आहे. वागदे व कुडाळ येथे चौपदरीकरणासाठी रस्त्याची रुंदी ६०ऐवजी ४५ मीटर्स ठेवण्याचा निर्णय झाल्याने तेथील समस्याही संपली आहे. भूसंपादनासाठी जमीन मालकांना मिळणाऱ्या भरपाई रकमेची घोषणाही लवकरच होणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा आहे. चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी उड्डाणपुलांचा पर्याय स्वीकारणाऱ्या त्या त्या ठिकाणच्या बाजारपेठांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे.