शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर हागणदारीमुक्त घोषित

By admin | Updated: March 22, 2016 00:56 IST

नगरपालिका विशेष सभेत निर्णय : शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव मंजूर

इस्लामपूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत इस्लामपूर शहर सोमवारी ‘हागणदारीमुक्त शहर’ म्हणून घोषित करण्यात आले. हागणदारीमुक्त शहराचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झाला. सभेत विकास कामाच्या निधी वाटपावरुन माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. पालिका सभागृहात सोमवारी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा झाली. सभेत मुख्याधिकारी झिंजाड यांनी शहराला हागणदारीमुक्त करण्याच्या उद्घोषणेची माहिती दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत २0११ च्या जनगणनेनुसार ६८0 शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी ७८ लाखांचा निधी मिळाला आहे. शासनाचे १२ हजार रुपये व पालिकेतर्फे १४ व्या वित्त आयोगातून २ हजार ५00 रुपये अनुदान देण्यात येणार आहे.ते म्हणाले की, शहरात सध्या ४२९ सार्वजनिक शौचालये आहेत. आणखी ४0 शौचालयांचे काम चालू आहे. शासनाने आतापर्यंत दोन टप्प्यात ७0 शहरांना हागणदारीमुक्त शहर म्हणून घोषित केले आहे. आता तिसऱ्या टप्प्यात इस्लामपूरचासमावेश होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासन समितीच्या पाहणीनंतर हागणदारीमुक्त शहराला १ कोटी ५0 लाखांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी द्यावी, अशी मागणी झाली. त्यावर सभागृहाने एकमुखाने या विषयाला मंजुरी दिली.विरोधी गटाच्या विजय कुंभार यांनी, राहिलेल्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर झिंजाड यांनी, शासनस्तरावर निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. विजयभाऊ पाटील म्हणाले, शहर हागणदारीमुक्त झाल्यानंतर जे अनुदान मिळेल, त्यातून वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान देऊ. शहरासाठी होणारा पाणी उपसा, शुध्दीकरणानंतर होणारा पाण्याचा वापर आणि त्यातील गळती रोखणे, अशा उपाययोजनांसह पाणी योजनेसाठी होणाऱ्या वीज वापराच्या आॅडिट कामाला मुदतवाढ देण्यात आली. तसेच नवीन डंपर प्लेसर खरेदीचा निर्णय झाला. आरोग्य व बांधकाम विभागाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)कर भरा : अन्यथा दंड व व्याजाची आकारणीशहरातील नागरिकांनी कर वेळेत भरुन पालिकेस सहकार्य करावे. विशेषत: थकबाकीदारांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. करवसुली कायद्यामध्ये नव्याने झालेल्या सुधारणेतून प्रत्येक महिन्याला शास्ती (व्याज) भरावे लागते. त्याचे प्रमाण जवळपास २४ टक्के इतके आहे. ही शास्ती कमी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत कर भरा, असे आवाहन मुख्याधिकारी झिंजाड यांनी केले.