शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

इस्लामला भारतातच खरे स्वातंत्र्य

By admin | Updated: May 25, 2016 23:36 IST

अब्दुल अंजारिया : मुस्लिम तरूणांच्या मनात आळवले देशप्रेम

खेड : संबंध भारतात इस्लाम आजही सुरक्षित आहे. तरीही विविध आमिषापोटी इस्लामी तरूण इसिसच्या जाळ्यात अडकत आहेत, ही चिंतेची बाब आहे. इसिस ही दहशत निर्माण करून रक्तपात घडवून आणणारी संघटना इस्लामला अजिबात मान्य नाही. इस्लाम ते कधीही खपवून घेणार नसून, ही संघटना म्हणजे इस्लाम नव्हे. यापुढे तरूणांनी या संघटनेच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन दिल्लीच्या जामा मशिदचे सल्लागार डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांनी येथील मुस्लिम तरूणांना केले. इस्लामला इतर देशांच्या तुलनेत भारतातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असल्याचेही ते म्हणले.इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विविध आमिषांना बळी पडून भारतातील अनेक मुस्लिम तसेच गैरमुस्लिम तरूण या संघटनेमध्ये सहभागी होत आहेत. मुस्लिम तरूणांसह सर्वधर्मीय तरूणांचे समुपदेशन करण्याच्या हेतूने दिल्ली येथील जामा मशिदीचे सल्लागार डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांनी खेड पोलीस स्थानकात बुधवारी दुपारी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये उपस्थित तरूणांना आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहायक पोलीस अधीक्षक डॉ. चिन्मय पंडित, खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, पोलीस निरीक्षक विकास गावडे, जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष सहाय्य विभागाचे डॉ. कुलकर्णी, बाणकोटचे ज्येष्ठ नागरिक आतिफ परकार, खेड येथील मुस्लिम समाजाचे गौस खतीब यांच्यासह सुमारे १०० मुस्लिम तरूण उपस्थित होते.सहायक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी डॉ. अब्दुल्ल अंजारिया यांचे स्वागत केले. डॉ. अंजारिया हे दिल्ली येथील जामा मशिदीचे सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद या विषयावर अभ्यास आहे. खेड पोलीस स्थानकात आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी मुस्लिम तरूणांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भारत हा देश हा मुस्लिमांसाठी कसा धर्मनिरपेक्ष आहे आणि भारतभूमीमध्ये मुस्लिम तरूण कसे सुरक्षित आहेत, याबाबत त्यांनी अनेक दाखले देत देशाचे महत्त्व पटवून दिले. धर्मनिरपेक्ष देश म्हणजेच भारत! अशा शब्दात त्यांनी आपले भारतप्रेम आळवले. त्यांनी इसिस या संघटनेबद्दल अनेक धोक्याचे इशारे दिले. या संघटनेचा इस्लामशी काहीही संबंध नाही. सध्या इंटरनेटद्वारे जग जवळ आले आहे. याचा गैरफायदा ही संघटना घेत आहे. फेसबुक, ट्वीटर आणि गुगलसारख्या सोशल मीडियामध्ये काही महत्त्वाचे मेसेज किंवा माहिती मिळवण्याच्या आपण नेहमीच प्रयत्न करीत असतो. अशावेळी या दहशतवादी संघटनेची ५ हजार तरूणांची भरती करावयाची असल्याबाबतची आणि याकरिता गडगंज पैसा मिळविण्याची हमी देणारी पोस्ट अशा सोशल मीडियावर टाकलेली असते. यासाठी काही सुंदर तरूणींचा वापर करून तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. ़विशेष म्हणजे या तरूणी अस्तित्वातच नसल्याचे प्रथम तरूणांनी लक्षात घ्यायला हवे. ही मुस्लिम तरूणांची फसवणूक असते. मात्र, चॅटिंग करतानाच फेसबुकमधील मेसेंजेरशी चॅटिंग केली जाते. ही चॅटिंग सुरू असतानाच अलगद आपला मोबाईल नंबर आणि आपल्याविषयी संपूर्ण माहिती ही संघटना हॅक करते. याद्वारे ही संघटना आपल्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कडवट मेसेज पाठवते आणि हाच मेसेज व्हायरल होतो. हा मेसेज आपण इतर ग्रुपना सेंड करतो़ आणि इस्लामी तरूणांची डोकी भडकवण्याचे काम याद्वारे केले जात आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)