शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात उलटली जेटीत वाहने

By admin | Updated: November 13, 2016 23:24 IST

मिरकरवाडा येथील दुर्घटना : एक जखमी; मोटार मागे घेताना टेम्पोला धडक

रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर चारचाकी गाडी व रिक्षा टेम्पोची धडक बसून दोन्ही वाहने जेटीत पडली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत हाजी मलंग हुसेन साहब (४४, मुरूगवाडा, रत्नागिरी) जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर क्रेनच्या सहाय्याने या गाड्या बाहेर काढण्यात तेथील नागरिकांना यश आले. ही घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. दादा सावंत हे पत्नी व मुलाला सोबत इस्टीम चारचाकी गाडी (एमएच-०८-सी-७३६०) घेऊन मिरकरवाडा जेटीवर मासे आणण्यासाठी गेले होते. सकाळी १० च्या सुमारास ते मिरकरवाडाजेटी येथे गेले. आपल्या मुलाला व पत्नीला गाडीतून उतरवून ते गाडी मागे घेत होते. त्याचवेळी पाठीमागे हाजी हुसेन साहब यांचा रिक्षा टेम्पो पार्क करून ठेवला होता व ते आतमध्ये बसले होते. दादा सावंत हे गाडी मागे घेत असताना त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि इस्टीम कारची रिक्षा टेम्पोला जोरदार धडक बसली. क्षणातच दोन्ही वाहने जेटीवरून खाली पडली. या दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये हाजी हुसेन साहब हे जखमी झाले. मिरकरवाडा जेटी येथे केमिकल मिश्रीत पाणी व गाळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही वाहने गाळामध्ये अडकत चालली होती. त्यामुळे तेथील काही खलाशांनी पाण्यात उड्या मारून दादा सांवत व हाजी हुसेन साहब यांना पाण्यातून बाहेर काढले. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या हाजी यांना अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही दोन्ही वाहने खाऱ्या पाण्यात पडल्यामुळे या वाहनांचे मोठ्या-प्रमाणात नुकसान झाले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही वाहने क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. (वार्ताहर)