शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

सुरुंगाच्या स्फोटाने घरांना धोका निर्माण

By admin | Updated: December 30, 2014 23:35 IST

काळा दगड असल्याने खांदाटपाली गावात चारी बाजूंनी कॉरी व क्रशर सुरु आहेत. स्फोटाच्या दणक्याने गावातील दोन विहिरींना तडे

चिपळूण : तालुक्यातील खांदाटपाली येथे डबर उत्खननासाठी भूसुरूंगाचा वापर होतो. दररोज होणाऱ्या सुरुंगाच्या या स्फोटाने आजूबाजूच्या बहुतांश घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील क्रशर बंद करण्यात यावी, अन्यथा उपोषणास बसू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. येथील विहिरींना तडे गेले असून पाण्याची पातळी त्यामुळे खालावत आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. काळा दगड असल्याने खांदाटपाली गावात चारी बाजूंनी कॉरी व क्रशर सुरु आहेत. स्फोटाच्या दणक्याने गावातील दोन विहिरींना तडे गेले आहेत. खाणीमध्ये अंदाजे दिडशे ते दोनशे मीटरमध्ये ब्लास्टिंग करुन सुरुंग लावले जात आहेत. त्याच्या दणक्याने घरांनाही धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याने वाहून जाणाऱ्या ग्रीटमुळे गावातील ८० टक्के शेतजमीन नापीक झाली आहे. खांदाट येथे दोन कॉरी व क्रशरच्या येथून अंदाजे १०० मीटर अंतरावरुन कोयना ते गुजरात टॉवर लाईन व कोयना ते मुंबई एमआयडीसी टॉवर जात आहे. या टॉवर लाईनला धोका निर्माण झाल्यास जीवित हानीची भीती व्यक्त केली आहे. तहसीलदार वृषाली पाटील, प्रांताधिकारी रवींद्र हजारे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले आहे. (वार्ताहर)चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली येथे क्रशर सुरु असून, त्याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. हा क्रशर बंद करण्यात यावा, असा ठराव २ डिसेंबर रोजी ग्रामसभेत करण्यात आला आहे. या ठरावावर सूचक म्हणून सुभाष पाटील, तर अनुमोदक म्हणून दिनकर महाडिक यांची नावे आहेत. ठरावाच्या प्रतीवर ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या नावाचा शिक्का आहे.