राजापूर : तालुक्यात २७,१८२ घरगुती गणपतींसह आठ सार्वजनिक गणपतींची गणेश चतुर्थी दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामध्ये राजापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत १९,९०० घरगुती तर सहा सार्वजनिक तर नाटे पोलीस स्थानकाच्या हद्दीत ७,२८२ घरगुती आणि २ सार्वजनिक गणपतींचा सामावेश आहे.
दरवर्षी राजापूर तालुक्यात गणेशोत्सव धडाक्यात साजरा होतो. मात्र, गतवर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे गणेशाेत्सवावर मर्यादा आल्या आहेत. काेराेनाचे सावट असले तरी नियमांचे पालन करून तालुक्यातील नागरिकांनी गणेशाेत्सवाची तयारी केली. गणेशाेत्सवामुळे तालुक्यातील वातावरण भक्तीमय झाले आहे. तालुक्यात राजापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात १९,९०० घरगुती तर ओझर, ओणी, दसूर,, राजापूर एसटी आगार, विद्युत वितरण, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असे सहा सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. तर नाटे पोलीस कार्यक्षेत्रात ७,२८२ गणपतींचा सामावेश आहे. नाटे हद्दीत जैतापूर व आडिवरे येथे सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.
गणपती उत्सवामुळे तालुक्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली हाेती. मुंबईवासीय चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावात दाखल झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावागावात घ्यावयाची काळजी याबाबत तेथील ग्रामपंचायती, ग्रामकृती दल यांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत.