शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक सुरक्षेचे यंत्र बिघडलेलेच!

By admin | Updated: November 2, 2014 00:49 IST

वाऱ्यावरची वरात : कंपन्या एकीकडे, सुरक्षेचे कार्यालय दुसरीकडेच...

श्रीकांत चाळके, खेड : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षाव्यवस्था सध्या धोक्यात आली आहे. कंपन्यांमध्ये विविध कारणाने अपघात होत आहेत. कारखान्यांच्या सुरक्षिततेच्या दुुष्टीने या वसाहतीमध्ये कोणतीही सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली नाही. यामुळे या अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे बोलले जात आहे़ मात्र यामध्ये कामगारांचा हकनाक बळी जात असून औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी येथे येऊन नेमके काय करतात? याविषयीच आता शंका उपस्थित होऊ लागले आहे.सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा आणि तिचे कार्यालय कोल्हापूर येथे असल्याने येथील कंपन्या बेफिकिरपणे काम करीत आहेत. शिवाय येथील उद्योजकांचे पैशासाठी वाट्टेल ते करायची तयारी आहे़ राजकीय पुढारी आपले मोठमोठे ठेके हातून जातील, या भीतीने कंपन्यांविरोधात ब्र काढायला तयार नाहीत़ यामुळे अपघात होऊनही कंपन्यांना जाब विचारण्यास धजावत नाहीत. यामुळे या वसाहतीतील सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ अनेक कामगारांचे हकनाक बळी गेले आहेत़ औद्यौगिक सुरक्षेसाठी असलेले कार्यालय येथे नसल्याने आणि कंपन्यांना विचारणारे कोणी नसल्याने लोटे औद्यौगिक वसाहतीच्या कारखान्यांतील कामगारांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे.वर्षभरात याच औद्यौगिक वसाहतीतील रत्नागिरी केमिकल्स प्रा. लि. आणि सुप्रिया लाईफसायन्सेस लि़ या कारखान्यात वायूगळती झाली होती़ यातील रत्नागिरी केमिकल्स कंपनीमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला तर सुप्रिया लाईफसायन्सेसमध्ये १२ कामगारांना वायुबाधा झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते़ यानंतर आठवडाभरातच याच कंपनीत एका कामगाराच्या अंगावर लोखंडी टाकीचा स्टॅण्ड पडला होता़ यामुळे त्याच्या चेहऱ्यावर रसायन उडाल्याने तो भाजल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी दोन्ही कंपन्यांच्या मालक आणि व्यवस्थापन आणि आॅपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ या घटनेच्या काही महिने अगोदर डॉ़ खान कंपनीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात ३ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता.वर्षभरात अशा अनेक आगीच्या आणि स्फोटाच्या घटना घडत असताना जखमी व मृत कामगारांची यादी मात्र वाढतच चालली आहे. याला मानवी चुका आणि तांत्रिक दोषदेखील जबाबदार आहेत़ तरीदेखील औद्यौगिक सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते कोल्हापूर येथील पथक अद्याप सुस्तच आहे. कारखान्यांच्या तपासणीसाठी वारंवार येत असलेले हे अधिकारी नेमके काय करतात? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मोठमोठे अपघात घडूनही हे अधिकारी कंपनीला जबाबदार धरीत नाहीत, तसेच अधिकाऱ्यांना दोषही देत नाहीत़ अनेक कारखान्यांमध्ये आजही सुरक्षेविषयक आवश्यक साधनसामुग्रीचा अभाव आहे.कंपन्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न आजही गंभीर बनला आहे. या दूषित पाण्यामुळे खाडीतील पाणी प्रदूषित होत असून मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यामुळे येथील कंपन्यांचे भवितव्यदेखील टांगणीला लागले आहे. कमी पगारात येथील अशिक्षित स्थानिक तसेच परप्रांतीय कामगारांना राबवून घेतले जात असून त्यांनाच हे अधिकारी व कंपन्या जबाबदार धरीत आहेत़ लागोपाठ घडत असलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणालाही कसलेही गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे़ पंजाब केमिकल कंपनीतील गेल्या दोन वर्षातील स्फोटांची गंभीर समस्या कंपनीसमोर आहेच़ घर्डा कंपनीमध्ये तर अधूनमधून लहानमोठे अपघात घडत असतात़ मात्र या कंपनीने विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारल्या आहेत. यामुळे येथील कामगार काहीअंशी सुरक्षित असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे़ औद्यैगिक सुरक्षा व्यवस्थेचे कार्यालय येथे नसल्याने या वसाहतीतील अनेक कंपन्यांवर आजही धोक्याची टांगती तलवार आहे.