शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरेश प्रभूंकडून ‘विज्ञान एक्स्प्रेस’चे उद्घाटन

By admin | Updated: July 15, 2017 15:45 IST

रत्नागिरीत ट्रॅकवर उभ्या असलेल्या १६ बोगीच्या रेल्वेमध्ये प्रदर्शन सुरू

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी (जि. रत्नागिरी), दि. १५ : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे रत्नागिरी स्थानकात आलेल्या ‘सायन्स एक्सप्रेस’मधील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. त्यानंतर पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सायन्स एक्सप्रेसचे फीत कापून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ३वरील ट्रॅकवर उभ्या असलेल्या १६ बोगीच्या रेल्वेमध्ये हे विज्ञान प्रदर्शन सुरू झाले आहे. यावेळी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी प्रदीप पी., पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, सेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, पर्यावरण बदलावर जगभरात मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. यासाठी स्थानिक पातळीवरही प्रयत्न होणे गरजेचे असून, त्याचे मार्गदर्शन होण्यासाठीच रेल्वेमधील विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम देशभरात राबविला जात आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले, दहा वर्षांपूर्वी सायन्स एक्सप्रेस रत्नागिरीत आली होती. त्यानंतरच्या काळात पर्यावरणात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळेच यावेळी या सायन्स एक्सप्रेसमधील प्रदर्शनात पर्यावरणातील बदलाची माहिती व त्यावरील उपाययोजना, पर्यावरणातील बदलाशी सुसंगतपणा कसा आणावा, याची माहिती सर्वांना मिळणार आहे. १४ ते १६ जुलैपर्यंत तीन दिवस रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांना पाहता येणार आहे. शाळांमधील विद्यार्थी, रेल्वे प्रवासी यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.