अडरे : लायन्स क्लबच्या नियमावलीनुसार २०१९-२० मध्ये जगदीश वाघुळदे यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या चिपळूण लिओ क्लबचा अध्यक्ष प्रणव मेहता, सचिव कौशल गांधी, खजिनदार अभिषेक गांधी यांच्या उपस्थितीत शपथविधी समारंभ पार पडला.
सन २०२१-२२ साठी नूतन अध्यक्ष गौरव गांधी, सचिव आदित्य चौगुले, खजिनदार भाविन जैन व इतर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली . त्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. माजी रिजन चेअरमन नितीन गांधी यांचे हस्ते शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सल्लागार जगदीश वाघुळदे, माजी झोन चेअरमन अरुण कदम, दिलीप जैन, शांतीलाल गांधी, मिलिंद मेहता, गॅलॅक्सी क्लब अध्यक्ष रुमा देवळेकर, अक्षता रेळेकर व विभावरी जाधव उपस्थित हाेते. सूत्रसंचलन राजकुमार जैन, श्रीनिवास परांजपे यांनी केले.