शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

सुधारित नळ योजनेचे

By admin | Updated: October 2, 2016 23:19 IST

रत्नागिरी नगरपरिषद : जिल्हाध्यक्ष बाळ मानेंच्या प्रयत्नांना यश

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी रत्नागिरी नगरपरिषदेसाठी बहुप्रतीक्षित सुधारीत नळपाणी योजनेचे घोडे अखेर गंगेत न्हाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या ६३ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या या सुधारित नळपाणी योजनेतील ५०पेक्षा अधिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आचारसंहितेच्या पूर्वी कोणत्या मुहूर्तावर होणार, याबाबत रत्नागिरीकरांना उत्सुकता आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारी सर्वच वितरण व्यवस्था खराब झाली आहे. शीळ धरणावरील मुख्य जलवाहिनी गंजल्याने जागोजागी फाटली आहे. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात आहे. १९६५ पासून कार्यरत पानवल धरणावरून आलेली जलवाहिनीही खराब झाली आहे. जलशुध्दिकरण प्रकल्पाची दुरुस्ती आवश्यक आहे. शहरातील घरा-घराकडे पाणी पोहोचविणाऱ्या अंतर्गत जलवाहिन्या गंजल्याने बाद झाल्या आहेत. अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणेही अवघड बनले आहे. शीळ व पानवल धरणात मुबलक पाणी असूनही पाणी वितरण वाहिन्यांतील दोषामुळे शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा किवा पाणीच न येणे या समस्यांना दहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी सातत्याने याबाबत नगरपरिषदेतील कारभाऱ्यांकडे टाहो फोडूनही गेल्या दहा वर्षात काही घडले नाही, पाण्याची समस्या सुटली नाही. त्यामुळे सुधारित पाणीपुरवठा योजनाही त्याच परंपरेतील असावी, केवळ हुलकावणी दिली जात असावी, असेच रत्नागिरीकरांना वाटत होते. रत्नागिरीत सुधारित नळपाणी योजनेबाबत याआधी बरेच महाभारत घडून गेले आहे. या योजनेच्या सादरीकरणावरून शिवसेना व भाजप यांच्यात जोरदार राजकीय कलगी-तुरा रंगला होता. रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे सादरीकरण द्यावे, असा आग्रह शिवसेनेने धरला होता. त्यामुळे वातारवण तणावपूर्ण झाले होते. सभागृहाचा ताबा सेनेने घेऊ नये, यासाठी नगरपरिषदेने नियमानुसार सभागृह सील केले होते. या आठवणी ताज्या असतानाच ही सुधारित नळपाणी योजना तळमळीने प्रयत्न करून भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी मंजूर करून घेतली आहे. ६३ कोटींच्या या योजनचे काम निवडणूक आचारसंहितेपूर्वी सुरू करण्याच्या हालचालीही आता सुरू झाल्या आहेत. या कामाची सुरूवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे आधीही सांगण्यात आले होते. आता योजना मंजूर झाल्याने योजनेच्या आरंभासाठी मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरीत येणार काय, त्यांच्या उपस्थितीत योजना आरंभाची सभा ‘निवडणूक प्रचार’ सभा ठरणार काय, याबाबत चर्चा रंगली आहे. योजनेचा लाभ भाजपला होणार? गेल्या सहा महिन्यांच्या काळापासून रत्नागिरीतील सुधारित नळपाणी योजना हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा शहरात होती. मात्र, भाजपने ही योजना मंजूर करून आणली. या योजनेचा शुभारंभही निवडणुकीपूर्वी होईल. त्यामुळे योजनेच्या या यशाचे रुपांतर येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या मतवाढीमध्ये होणार काय, भाजपचा थेट नगराध्यक्ष होणार काय, या प्रश्नांची चर्चा शहरात होत आहे. बाळ माने यांनी मुख्यमंत्र्याकडे केला पाठपुरावा. योजनेच्या आरंभासाठी मुख्यमंत्री येणार? रत्नागिरीला पाणीपुरवठ्याचे वितरण करणारी व्यवस्था खराब. अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणेही अवघड.