शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अंमलबजावणी जलद होणे आवश्यक

By admin | Updated: March 19, 2015 00:02 IST

जया सांगडे : कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याबाबत रत्नागिरीत कार्यशाळा

रत्नागिरी : कायद्याने नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या, भूमिका आणि कामे पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व संरक्षण अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने व अधिक सजगतेने निभावल्यास कौटुुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व जलद गतीने होणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील महिला अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. जया सांगडे यांनी रत्नागिरी येथे केले.महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम २००५ या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व संरक्षण अधिकारी, सेवा पुरवणारे, पोलीस उपनिरीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा रत्नागिरी येथे पार पडली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. सांगडे बोलत होत्या.कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जे. एस. शेख यांच्याहस्ते झाले. या कार्यशाळेसाठी स्वीस एड इंडिया, पुणे व हेरिटेज कल्चर आर्ट अ‍ॅण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, लांजा यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यशाळेचे संयोजन हेरिटेज कल्चर संस्थेने केले होते.कार्यशाळेत महिला अभ्यास केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक प्रसन्ना इनवली, प्रसिद्ध स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या अर्चना मोरे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम २००५ विषयी दोन दिवस विस्ताराने मार्गदर्शन केले. कार्यशाळेत कौटुंबिक हिंसाचार कायदा व लिंग समभाव याबाबत अर्चना मोरे यांनी, कायद्याचा उद्देश, तरतुदी व प्राथमिक कार्यवाही, पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत जया सांगडे यांनी तर संरक्षण अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रसन्ना इनवली यांनी मार्गदर्शन केले. कौटुंबिक घटना अहवाल, अर्ज क्र. ४, १, ३ व कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम २००५ अन्वये प्रकरणदाखल करताना घ्यावयाची काळजी याबाबतही जया सांगडे, अर्चना मोरे व प्रसन्ना इनवली यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, सर्व संरक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्पाचे अधिकारी व पर्यवेक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षाच्या प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हेरिटेजचे अध्यक्ष संतोष कांबळे, ट्रस्टी अपर्णा पवार, संकेत नामये, संतोष गायकवाड, महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)