शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सेना-भाजप युती असती तर...

By admin | Updated: October 21, 2014 23:39 IST

विधानसभा निवडणूक : हार-जीतनंतर आता चर्चांना उधाण, जिल्ह्यात दिसले असते वेगळे चित्र!

रत्नागिरी : आत्याला मिशा असत्या तर... ही म्हण कितीही उजळली गेली तरी कुठल्याही निवडणुका झाल्यानंतर ‘जर-तर’ची गणिते चर्चिली जातात. सरकारी कार्यालय असो, व्हॉटस् अ‍ॅपचा कट्टा असो किंवा पारावरच्या गप्पा असोत. जिकडे-तिकडे जर-तरच्या गप्पांना उत येतो. अशाच गप्पा आता शिवसेना-भाजप युतीशी संबंधित सुरू झाल्या आहेत. जर हे दोन पक्ष वेगळे झाले नसते तर महाराष्ट्रात आज वेगळेच चित्र बघायला मिळाले असते. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या दोन जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतल्या आहेत, त्याही युतीलाच मिळाल्या असत्या आणि रत्नागिरी जिल्ह्यात भगवा आणखीनच डौलाने फडकला असता, असाच सूर आता उमटत आहे.बंडखोरी झाली आणि जागा गमावली, असे चित्र जिल्ह्यात याआधीही पाहायला मिळाले आहे. काँग्रेसबाबत हा प्रकार अनेकदा पाहायला मिळाला आहे. मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याचा प्रकारही नवीन नाही. पण शिवसेना आणि भाजप हे अनेक वर्षांचे दोन मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहतील, असे अपेक्षितच नव्हते आणि या निवडणुकीत ते पाहायला मिळाले.जिल्ह्यातील सध्याच्या पाच मतदार संघांमधील रत्नागिरी आणि गुहागर या दोन जागा भाजपच्या वाट्याला येत होत्या. त्यामुळे भाजपची जी काही वाढ झाली ती या दोन मतदार संघांमध्येच झाली. इतर तालुक्यांमध्ये भाजप अस्तित्त्वात असली तरी ती फार मोठी नव्हती. या दोन जागांपैकी रत्नागिरीतील पक्षांतर सेनेच्या पथ्यावर पडले. पण गुहागर आणि दापोली या दोन जागा मात्र शिवसेनेला मिळवता आल्या नाहीत. जर शिवसेना-भाजप युती असती तर या चित्रात फरक पडला असता.दापोलीत राष्ट्रवादीचे संजय कदम ३ हजार २६४ मतांनी विजयी झाले. येथे भाजपच्या केदार साठे यांना १३ हजार ८७५ मते मिळाली. ही मते जर सेनेच्या सूर्यकांत दळवी यांना मिळाली असती तर काँग्रेस आघाडीपेक्षाही त्यांची मते अधिक होती. त्यामुळे येथे युतीचा विजयी सहज होता.गुहागर मतदार संघात राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी एकहाती दणदणीत लढत दिली आहे. त्यांना ७२ हजार ५२५ मते मिळाली. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपले मताधिक्य खूपच वाढवले आहे. भाजपचे डॉ. विनय नातू यांना ३९ हजार ७६१ आणि शिवसेनेच्या विजयकुमार भोसले यांना ३२ हजार ८२ मते मिळाली. म्हणजेच युतीची मते ७१ हजार ८४४ इतकी होत आहेत. जाधव यांची मते यापेक्षा अधिक आहेत. पण युती असती तर गुहागरमधील मते नक्कीच वाढली असती. त्यामुळे युतीला ही जागा मिळवण्याचीही संधी होती. अर्थात युती झाली नाही त्यामुळे शिवसेनेला पाचऐवजी तीन जागांवरच समाधान मानावे लागले आहे आणि भाजपला एकही जागा मिळालेली नाही. (प्रतिनिधी)सामान्य कार्यकर्त्यांना युती हवी होती..शिवसेना-भाजप युती तोडण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना युती हवी होती. युती तोडण्याच्या निर्णयाबद्दल अनेकांनी नापसंती व्यक्त केली. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करावा लागल्याने दोन्ही पक्षांना तोटा सहन करावा लागला आहे आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ सोसावे लागणार आहेत.