शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात घरावर झाड पडून पती-पत्नी जखमी, मुले बालंबाल बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST

राजापूर : मुसळधार पावसामुळे शहरानजीकच्या शीळ येथील जयकुमार बिर्जे आणि विश्‍वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना रात्री ...

राजापूर : मुसळधार पावसामुळे शहरानजीकच्या शीळ येथील जयकुमार बिर्जे आणि विश्‍वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना रात्री १ वाजण्याच्यादरम्यान घडली. घराच्या ज्या ठिकाणी झाड पडले, त्या खोलीमध्ये विश्‍वास बिर्जे, त्यांची पत्नी आणि दोन मुले झोपलेली होती. या घटनेमध्ये सुदैवाने झोपलेल्या लहान मुलांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र, विश्‍वास आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहेत.

रात्रीचे जेवण उरकून विश्‍वास बिर्जे, त्याची पत्नी नीलम दोन छोट्या मुलांसह घराच्या पाठीमागील पडवीतील खोलीमध्ये झोपली होती. गाढ झोपेमध्ये असताना रात्री अचानक अंगावर मोठे काहीतरी पडल्याची त्यांना जाणीव झाली. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले पती-पत्नी तात्काळ जागी होऊन त्यांनी खोलीतील लाईट सुरू केला. खोलीमध्ये छप्परावरील तुटलले पत्रे पाहून स्वतः जखमी झालेल्या स्थितीमध्ये छोट्या मुलांना घेऊन खोलीतून बाहेर पडले.

दरम्यान, ही माहिती शीळचे उपसरपंच अशोक पेडणेकर आणि सहकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी किरकोळ जखमी झालेल्या विश्‍वास बिर्जे व त्यांच्या पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या दाेघांचीही प्रकृती व्यवस्थित असल्याचे उपसपरपंच पेडणेकर यांनी दिली. दरम्यान, साेमवारी सकाळी पडवीच्या छपरावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करून पडवी मोकळी करण्याचे काम करण्यात आले. सरपंच नामदेव गोंडाळ, तलाठी कोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी आणि पंचनामा केला. आंब्याचे झाड पडून नुकसान झालेली पडवी सुस्थितीमध्ये होईपर्यंत बाजूच्या घरामध्ये बिर्जे कुटुंबियांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपसरपंच पेडणेकर यांनी दिली.