शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून पतीचा मानसिक छळ

By admin | Updated: October 14, 2015 00:05 IST

अंजनवेल भ्रष्टाचार प्रकरण : ग्रामसेवकाच्या पत्नीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये रस्ता न करताच लाखो रुपये वापरल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात तत्कालीन उपसरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या पतीचा गुहागर पंचायत समितीचे काही पदाधिकारी, अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप या प्रकरणातील ग्रामसेवकाच्या पत्नीने केला आहे. पतीचे बरे-वाईट झाल्यास त्याला पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील, असे गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझे पती सन २००७ ते २०१२मध्ये अंजनवेल ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करीत होते. खरेतर श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या अंजनवेल ग्रामपंचायतीचा कारभार करताना गुहागर पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना कामामधील झालेल्या अनियमितपणाबद्दल वेळीच मार्गदर्शन करून सहकार्य करणे गरजेचे होते. परंतु त्यावेळी सर्वांनी तसे न करता माझ्या पतीला केवळ मानसिक त्रास देण्याचे काम केले. माझ्या पतीला सन २०१०पासून त्या ग्रामपंचायतीमुळे फार मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करून जीवन जगावे लागत आहे. मार्च २०१२मध्ये त्यांना टी. आय. ए. (अ‍ॅटॅक) आलेला असून, त्यावेळेस डॉक्टरांकडे वेळीच उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. अति मानसिक त्रासामुळे हा अ‍ॅटॅक असल्याचे त्यावेळी डॉक्टरांकडून निदान करण्यात आले आहे. मात्र, आता तर अंजनवेल ग्रामपंचायतीमधील या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मानसिक त्रासामुळे ते घरात अत्यंत अस्वस्थ असतात, असे त्यांनी म्हटले आहे. पतीच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास अथवा मानसिक त्रासामुळे पुन्हा अ‍ॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला, तर त्यासाठी गुहागर पंचायत समितीमधील काही पदाधिकारी, अधिकारी व संबंधीत कर्मचारी जबाबदार असतील, असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामसेवकाची सर्वांकडून लूट झाली. दरम्यान, अंजनवेल ग्रामपंचायतीमधील तत्कालीन उपसरपंच, ग्रामसेवक व ठेकेदारावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जो विषय घेण्यात आला आहे. या विषयाची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती.मात्र, त्यावेळी सदर प्रकरण थांबवण्यासाठी तक्रार करणारे काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कारवाई थांबवतो, असे सांगणारे प्रशासकीय अधिकारी यांनी सुमारे १२ लाखांच्या आसपास तत्कालीन ग्रामसेवकाची लूट केली होती. सध्या सुरू असलेल्या तपासामध्ये याची माहिती पुढे येणार असून, यातून अनेकांची नावे समोर येणार आहेत. त्यावेळी यामध्ये अन्य कोणाचा समावेश आहे, याचा उलगडा होणार आहे. (प्रतिनिधी)रस्ता न करताच लाखो रूपये वापरल्याचा ठपका.गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.पतीचे बरे-वाईट झाल्यास पदाधिकारी, अधिकारी जबाबदार.या विषयाची यापूर्वीही झाली होती चौकशी.तपासामध्ये अन्य नावे समोर येणार.