शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

दहा हजार वीजखांब बदलणार कसे ?

By admin | Updated: November 12, 2014 23:57 IST

दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत

रत्नागिरी : दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत दहा हजार पोल बसविणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेला दिले आहे़ मात्र, हे आश्वासन पूर्ण कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या दालनात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी जोरदार चर्चा झाली़ या चर्चेच्या वेळी पदाधिकारी व सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते़ यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ हरीष जगताप, माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, सदस्य दत्ता कदम, अजित नारकर, स्वरुपा साळवी, नेत्रा ठाकूर, लांजा, राजापूर, संगमेश्वरचे पंचायत समित्यांचे सभापती, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. यावेळी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना पंपासाठी देण्यात येणाऱ्या कृषी कनेक्शनबाबत चर्चा झाली़ यावेळी ५० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़ यावेळी महावितरण कंपनीकडून रखडलेल्या कामांबाबत जोरदार चर्चा झाली़ यावेळी पदाधिकारी व सदस्यांनी पाणी पुरवठा योजना वीज कनेक्शन न देण्यात आल्याने त्या सुरु करता येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली़ तसेच जिल्ह्यातील ७१ प्राथमिक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे, त्याबद्दल सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली़ हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिले़ (शहर वार्ताहर)