मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामात आरटीओ कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त झाल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील आरटीओ कार्यालयातील कामकाज पूर्णपणो ठप्प झाले आहे. हे पाहता महत्त्वाचे काम असेल तरच कार्यालयात या अन्यथा थेट निवडणुकीनंतर भेटा, असे आवाहन अधिका:यांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून त्याची जय्यत तयारी केली जात आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी सरकारी कर्मचा:यांचा समावेश केला जातो. लोकसभा निवडणुकीप्रमाणोच यंदाही सरकारी कर्मचा:यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश केला जात असून, राज्यातील आरटीओ अधिकारी आणि कर्मचा:यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील तीन महत्त्वाच्या आरटीओ कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना कामासाठी खेटे मारावे लागत आहेत. निवडणुकीतील व्यस्त वेळापत्रकामुळे आरटीओतील कामकाजासाठी अपुरे मनुष्यबळ पडत असून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स देणो, नूतनीकरण करणो, दंड भरणो आदी कामे पूर्णपणो रखडली आहेत. हे पाहता नागरिकांनी काही महत्त्वाचे काम असेल तरच आरटीओ कार्यालयात यावे, अन्यथा थेट निवडणुकीनंतर यावे, असे आवाहन आरटीओ अधिका:यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
वडाळा आरटीओत जवळपास 90 कर्मचारी असून, यातील 35 कर्मचारी, अंधेरी आणि त्या अंतर्गत येणा:या बोरीवलीत साधारण 124 कर्मचारी कार्यरत असून, यातील जवळपास 110 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तर ताडदेव कार्यालयातील जवळपास 70 पैकी 40 ते 50 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. सध्या कर्मचारी या कामासाठी जात असतानाच ऑक्टोबर महिन्याच्या 7, 8, 14 आणि 15 तारखेला त्यांना पूर्णपणो डय़ुटी लागल्याचे आरटीओतील सूत्रंनी सांगितले.
1अंधेरी आरटीओ अधिकारी पी. जी. भालेराव यांनी सांगितले की, कर्मचारी नसल्याने कामे पूर्णपणो रखडली आहेत. आरटीओ कार्यालयातील सर्वच्या सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत.
2ताडदेवचे आरटीओ अधिकारी के. टी. गोलानी यांनी सांगितले की, कर्मचारी निवणुकीच्या कामात व्यस्त असल्याने आता कामे रखडू लागली आहेत.
3त्यामुळे नागरिकांनी निवडणुकीनंतरच यावे, असे आवाहन आम्ही प्रत्येकाला करीत आहोत. महत्त्वाचे काम असेल तरच या, असेही त्यांना सांगत आहोत.