शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

हाॅटेल्सची पार्सल, घरपोच सेवा आहे म्हणून जिभेचे चोचले करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लाटेतही वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हाॅटेल्स सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लाटेतही वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हाॅटेल्स सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. मात्र, पार्सल सेवा आणि घरपोच सेवा सुरू आहेत. मात्र, सध्या पावसाळा सुरू असल्याने नागरिकांनी पोटाचे आरोग्य सांभाळावे, त्यासाठी बाहेरचे खाणे सध्या तरी थांबवावे, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे पहिल्या लाटेत हाॅटेल्स बंद ठेवण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये संसर्ग कमी झाल्यानंतर ५० टक्के क्षमतेवर सुरू करण्यात आली. मात्र, पुन्हा मार्चमध्ये संसर्ग वाढताच केवळ पार्सल सेवा आणि घरपोच सेवा सुरू आहे. त्यामुळे खवय्यांची पावले पुन्हा हाॅटेल्सकडे वळली आहेत. परंतु, पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरचे खाणे टाळावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

n अधिकाधिक घरातील अन्न किंवा पदार्थ खावेत.

n गार अन्न न खाता ते गरम असलेले खावे. जेणेकरून पचनाबरोबरच घशाचे विकार होणार नाहीत.

n पचनाला हलके असलेले, गरम असे पदार्थच आहारात असावेत.

n या काळात पचनक्रिया क्षीण असल्याने आहार शक्यतो कमी घ्यावा.

पावसाळ्यात हे खाणे टाळावे

n पावसाळ्यात रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळावेत.

n शिळे पदार्थ, आंबलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे पोट बिघडते.

n काेल्ड्रींक्स, आईस्क्रिम, सरबत अशी पेये. गार पदार्थ या काळात खाऊ नयेत.

n दुग्धजन्य पदार्थ कमी खावेत.

n पाणी शक्यतो उकळून तसेच गरम सोसेल असे पिण्यासाठी घ्यावे.

रस्त्यावरचे अन्न नकाेच

पावसाळ्यात सर्वत्र दूषित पाणी असते. रस्त्यावरच्या उघडे अन्न अथवा खाद्यपदार्थांवर माशा बसत असतात. त्यामुळे आधीच पचनशक्ती मंदावलेली असल्याने हे उघडे अन्न खाल्ल्याने त्यापासून पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. या काळात पचनसंस्था अतिशय मंदावलेली असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही क्षीण झालेली असते. त्यामुळे अन्न किंवा खाद्यपदार्थ बाहेरचे न खाता घरचेच सकस अन्न खाण्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर गार झालेले पदार्थ आवर्जून टाळावेत, त्यामुळे पोटाबरोबरच घशाचे विकारही वाढतात. बाहेरचे अन्न शिळे तसेच त्यात वापरले जाणारे घटक हानीकारक असतात. त्यामुळे पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळणे आरोग्यासाठी हितकारक असते.

पावसाळ्यात पचनक्रिया क्षीण झालेली असते. जुन्या काळी आषाढ महिना रोगराईचा महिना मानला जात असे, ते योग्यच आहे. पाणी साचल्याने ते दूषित होते. त्यामुळे पावसात रोगराई वाढते. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरचे अन्न न खाता घरचेच गरम आणि सकस, ताजे अन्न् खावे. पालेभाज्या, फळे याकाळात शक्यतो टाळावीत.

- डाॅ. ज्ञानेश विटेकर, फिजिशियन, रत्नागिरी

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे ताजे आणि सकस अन्न् खाल्ले नाही तर पोटाचे विकार बळावतात. त्यामुळे घरातील अन्न खाण्यावरच अधिक भर असावा. या काळात उष्ण पदार्थ खाण्यावर भर असावा. अन्न कमी खावे आणि ते पचायला हलके असे असावे. या काळात वात उच्चस्थितीत असल्याने वात वाढेल, असे थंड पदार्थ खाऊ नयेत. बाहेरचे दुग्धजन्य पदार्थही टाळावेत.

- वैद्य सिद्धेश जोशी, रत्नागिरी