शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घरे मिळण्याच्या आशा झाल्या धूसर

By admin | Updated: July 23, 2016 23:52 IST

योजनेचे नाव बदलले : घरकुल योजनेतील जुन्या लाभार्थ्यांच्या समावेशाबाबत साशंकता

राजापूर : शासनाच्या इंदिरा आवास घरकुल योजनेतील अनेक लाभार्थी आजही घरकुलांच्या प्रतीक्षेत असताना आता शासनाने या योजनेचे नाव बदलून ‘प्रधानमंत्री आवास योजना’ केले आहे. मात्र, पूर्वीच्या योजनेमध्ये वंचित राहिलेल्या अनेक लाभार्थ्यांची घरकुले नवीन योजनेत सामाविष्ट करण्याबाबत स्पष्ट निर्देश दण्यात आलेले नसल्याने या वंचित लाभार्थ्यांना घरे मिळण्याची आशा धूसर बनली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या निवासाचा प्रश्न सुटावा व त्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारने इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व राजीव गांधी आवास योजना सुरु केल्या. या अंतर्गत बेघर आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांना या योजनेतून अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत २०१० साली यातील लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली व दरवर्षी टप्प्याटप्प्याने त्यांना लाभ देण्यात आला. इंदिरा आवास योजनेंतर्गत अजूनपर्यंत दोन हजार दोनशे पंचावन्न घरकुले पूर्ण झाली आहेत. राजापूर तालुक्यात कमी लाभार्थी असलेल्या ग्रामपंचायतींपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्राधान्यक्रमानुसार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोंडसर व धोपेश्वर या दोन ग्रामपंचायतींमधील १३९ घरकुले मंजुरीच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत. सन २०११मधील जनगणनेच्या निकषानुसार ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राजापूर तालुक्यातून २ हजार ६९७ घरकुलांचा प्रायोगिक तत्वावर सामावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेतील अनेक लाभार्थी मागील पाच - सहा वर्षे घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. आता तर शासनाने या योजनेचे नाव बदलले असून, नवीन योजनेतील निकषांमुळे प्रतीक्षा यादीतील लाभार्थी या निकषांमध्ये बसणे शक्य नाहीत. त्यामुळे या वंचित लाभार्थ्यांना घरकुल मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे यापुढेही या लाभार्थ्यांना बहुदा घरकुलापासून उपेक्षित राहावे लागणार अशीच शक्यता सध्या दिसत आहे. याप्रश्नी शासनाने लक्ष द्यावे व पूर्वीच्या योजनेमध्ये समाविष्ट वंचित लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)निर्देश नाहीत : घरकुले प्रतीक्षा यादीतराजापूर तालुक्यातील लाभार्थींची २०१० साली यादी तयार करण्यात आली. या यादीमधील कोंडसर आणि धोपेश्वर ग्रामपंचायतीमधील १३९ घरकुले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन योजनेत या घरकुलांच्या समावेशाबाबत कोणतेच निर्देश नसल्याने लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.