शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाटूळ गोवंदवाडीत अखेर पेटला दिवा!

By admin | Updated: September 23, 2016 00:41 IST

राजापूर तालुका : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतर प्रकाशली घरे

आनंद त्रिपाठी -- वाटूळ --मुंबई-गोवा महामार्गालगत वसलेल्या राजापूर तालुक्यातील वाटूळ या गावामधील बावकर गोवंदवाडीतील घरांना २१ वे शतक उजाडले तरीही विजेची प्रतीक्षा होती. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराळ व जंगलमय भागात वसलेल्या या वाडीत बावकर व मोहिते यांची तीन घरे आहेत. वाटूळचे माजी सरपंच व शिवसेना कार्यकर्ते नारायण चव्हाण यांनी राजापूरमधील आमसभेमध्ये आमदार राजन साळवी यांच्यासमोर या वाडीतील विजेबाबतची सत्य परिस्थिती मांडल्यानंतर सर्वजण हादरले. स्वातंत्र्यानंतरही याठिकाणी वीज नसल्याचे विदारक सत्य समोर आल्यानंतर आमदारांनी दखल घेतली. आमदार राजन साळवी यांनी या प्रश्नाची गंभीर घेतली व लागलीच प्रशासन यंत्रणा कामाला लागली. महावितरणच्या ओणी कार्यालयाने या वाडीमध्ये वीज पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि गणेशाचे आगमना दिवशीच या वाडीची विजेची प्रतीक्षा संपली व खऱ्या अर्थाने वाडीचे ‘अच्छे दिन’ सुरु झाले.काही जागा मालकांच्या असलेल्या विरोधामुळेच या वाडीत वीज पोहोचण्यास विलंब झाल्याचे या वाडीतील लोकांचे म्हणणे आहे. वीजखांबांसाठी जागा देण्यास विरोध करणाऱ्या जागा मालकांची समजूत घालून योग्य तोडगा काढणाऱ्या माजी सरपंच नारायण चव्हाण यांच्यामुळे वाडीत वीज आल्याचे ग्रामस्थ मोतीराम बावकर यांनी सांगितले. आमदार राजन साळवी यांनीही या विषयाची गंभीर दखल घेत त्वरित कार्यवाही केली. ओणी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता डी. एस. मोहिते, कनिष्ठ अभियंता एस. आर. गुरव, एन. डी. कांबळे, टी. एच. घाडी, आर. जी. लोहार, एस. पी. मेश्राम यांच्या प्रयत्नांमुळे आणि जमीन मालकांच्या सहकार्यामुळे गोवंदवाडीतील विजेची समस्या सुटली आहे.मुंबई - गोवा महामार्गालगत असणारे वाटूळ - गोवंदवाडी.माजी सरपंच नारायण चव्हाण यांनी आमसभेत मांडली परिस्थिती.वाडीतील विजेबाबतची सत्य परिस्थिती मांडल्यानंतर सर्वजण हादरले.आमदार राजन साळवी यांनी घेतली होती दखल.विजेची समस्या सुटली.